Ganesh Festival Tradition: चाररस्ता- काणकोण येथील भगत कुटुंबीय गेल्या अनेक पिढ्यांपासून एकत्रित गणेशोत्सव व नवधान्य उत्सव साजरा करीत आहेत.सध्या ४५ भगत कुंटुंबे या उत्सवात सहभागी होतात.
भगतवाडा येथील भक्ती मठात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.या ठिकाणी सर्व कुटुंबीयांतर्फे आरत्या व पूजा होते.पंचमीला सकाळी सर्व भगत कुटुंब प्रमुख शेतातून नव धान्य आणून त्याची मठात पूजा करतात.
त्यानंतर प्रत्येक कुटुंब प्रमुख केवणीची काठी ती मधोमध फोडली जाते.कणसे आंब्याची पाने ,तेरडा, घालून काठीत ती गुंफून काठी नवधान्याने सजवली जाते. ती काठी घेऊन घराच्या प्रवेशद्वारावर लावतो.
सणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
आमचे उत्सव केवळ गणेश चतुर्थीच्या उत्सवापलिकडे जाऊन ‘भगत कुटुंबीय नवधान्य उत्सव ( नव्याची परब)’ हा सण साजरा करतात, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, या सणाचे आपल्यासाठी अनन्यसाधारण असे सांस्कृतिक महत्त्व आहे. आपला समृद्ध वारसा, चालीरिती आणि परंपरांचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतो, असे सम्राट व महेश भगत यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.