

मोरजी: पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा तोरसे-तांबोसे-मोपा परिसराच्या दिशेने येण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी आणि बागायतदारांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने आता केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता तातडीने ठोस बंदोबस्त करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिक पंच तथा शेतकरी दया गवंडी यांनी दिला आहे.
दहा दिवसांपूर्वीच ओंकार हत्तीने तांबोसे, उगवे, कडशी-मोपा व लगतच्या भागात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. केळी, सुपारीसह विविध पिकांना त्याचा फटका बसला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप समाधानकारक नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचा दावा गवंडी यांनी केला.
वन खात्याने जागरूक रहावे
गवंडी म्हणाले की, हत्ती एका भागातून दुसऱ्या भागात गेल्यानंतर प्रश्न संपला, अशी भूमिका वन खात्याने घेऊ नये. तो पुन्हा गोव्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. गणेश चतुर्थी जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतकरी-बागायतदारांचे आर्थिक नियोजन शेती आणि बागायतीतील उत्पन्नावर अवलंबून असते.
रात्री पेडण्यात शिरण्याचा धोका
सध्या ओंकार हत्ती नेतर्डे-डोंगरपाल परिसरात पेडणे तालुक्याच्या सीमेलगत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तो रात्री-अपरात्री पुन्हा पेडणे तालुक्यात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तोरसे, तांबोसे, मोपा आणि आसपासच्या गावांतील शेतकरी पुन्हा सतर्क झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.