Camara Municipal De Salcete: मडगावातील ‘काम्र द सालसेत’ इमारत ‘मृत्यूशय्येवर’

Camara De Salcete: पालिकेची ही जुनी इमारत सांभाळून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे
Camara De Salcete: पालिकेची ही जुनी इमारत सांभाळून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे
Camara Municipal De SalceteDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मुसळधार पावसासमोर तग न धरू शकल्‍याने राष्‍ट्रवादी बाण्‍याचे संसदपटू म्‍हणून प्रसिद्ध असलेले डॉ. फ्रान्सिस्क लुईस गोम्स यांच्‍या नावेली येथील घराची पडझड झालेली असतानाच सुमारे १२० वर्षांचा इतिहास असलेली मडगावची जुनी नगरपालिका इमारतही धोकादायक स्थितीत आहे. ‘काम्र द सालसेत’ या नावाने एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या इमारतीचे जतन करणे गरजेचे आहे, असे मडगावासियांचे मत आहे.

संपूर्ण सासष्टी आणि मुरगाव तालुक्‍याचा प्रशासकीय कारभार हाताळणारी इमारती, तिला वारसा मूल्‍य असल्याने तिचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे, असे मत वारसाप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले. ही इमारत खासगी मालकीची हा मुद्दा पुढे करून या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याने या वर्षी पडलेल्‍या मुसळधार पावसात ही इमारतही जमीनदोस्‍त होणार तर नाही ना? अशी भीती वाटू लागली आहे.

सुमारे १२० वर्षांपूर्वी मडगावची नगरपालिका मडगाव बाजारात असलेल्‍या विद्यमान पालिका इमारतीत स्थलांतरित करण्‍यात आली. हेरिटेज वास्तू वारसाप्रेमी आणि संरक्षकांनी वारसा वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्‍न करावेत, यासाठी जोरदार प्रयत्‍न केले होते.

Camara De Salcete: पालिकेची ही जुनी इमारत सांभाळून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे
Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनलाही गळती; तियात्र कलाकारांकडून नाराजी व्यक्त

संग्रहालय करा

सुमारे १५ वर्षांपूर्वी मडगाव नगरपालिकेने ही काम्र द सालसेत इमारत आणि डॉ. फ्रान्सिस्क यांचे घर असलेल्या या मालमत्ताचे संग्रहालयात रूपांतर करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. तथापि, भूसंपादन प्रक्रियेत निधीची कमतरता तसेच या वारसा वास्तूचे पुनर्वसन करण्याच्या अधिकारांच्या अभावामुळे त्‍यात अडथळा निर्माण झाला होता. पालिकेची ही जुनी इमारत सांभाळून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com