सासष्टी : संततधार पडत असलेल्या पावसामुळे मडगावच्या रवींद्र भवनला गळती लागली असून पहिल्या मजल्यावर तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आता पहिल्या मजल्यावरील कॉन्फरन्स सभागृहाबाहेर गळती सुरू झाली असून या प्रकाराबद्दल तियात्र कलाकारांनी नाराजी व्यक्त केली.
पहिल्या मजल्यावर या सगळीकडे पाणीच पाणी झाले असून हे पाणी पुसून काढण्यासाठी काही मजूर काम करताना दिसतात.
भवनच्या मुख्य दरवाजाच्या आत स्वागत कक्षात ब्लॅक बॉक्स सभागृहात जाण्याच्या वाटेवर सुद्धा पाणी गळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तियात्र पहाण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनाही त्याचा त्रास होऊलागला आहे.
या संदर्भात तियात्र कलाकार पास्कोल द चिखली म्हणाले, रवींद्र भवन हे कला व संस्कृतीचे केंद्र असून संपूर्ण गोव्यातील लोक इथे तियात्र पहायला येतात. तेव्हा रवींद्र भवनच्या कार्यकारी समितीने याची त्वरीत दखल घ्यावी व ही वास्तू सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करावा.
याबद्दल रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक याबाबत म्हणाले, आम्ही याची दखल घेतली आहे. आम्हाला त्याची जाणीव आहे. पण पाऊस एवढा पडत आहे, की त्वरित दुरुस्तीचे काम हातात घेणे कठीण आहे.
आम्ही या पूर्वीच दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या कामांची यादी तयार केली आहे. त्यात वॉटरप्रुफींगच्या कामाचा समावेश आहे. मात्र पाऊस थांबल्यावरच हे काम प्राधान्यक्रमाने हातात घेतले जाईल. चिंता करण्याची काहीच गरज नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.