Mandovi Bridge: अजून आठवडाभर वाहतूक कोंडी! जुना मांडवी पूल दुरुस्तीसाठी बंद, सकाळ-संध्याकाळ होते वाहनांची प्रचंड गर्दी

Mandovi Bridge Closure: पणजी आणि पर्वरी दरम्यानच्या जुन्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी अजून किमान आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे.
Mandovi Bridge Closure
Mandovi BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Old Mandovi Bridge Closure Updates

पणजी: पणजी आणि पर्वरी दरम्यानच्या जुन्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी अजून किमान आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे १५ दिवसांसाठी पूल बंद ठेवण्यात आला आहे, त्यामुळे संपूर्ण वाहतूक नव्या मांडवी पुलावर वळविण्यात आली आहे.

परिणामी, सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्समध्ये वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पणजी शहरात आधीच स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्ते खोदकाम, पाइपलाइन टाकण्याचे काम आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक बदलांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आता त्यात जुन्या मांडवी पुलाच्या बंदीचा फटका बसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थाच कोलमडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

Mandovi Bridge Closure
Old Mandovi Bridge Closed: वाहनचालकांची डोकेदुखी वाढली; जुना मांडवी पूल 15 दिवस बंद, पर्यायी मार्ग काय?

पणजी बसस्थानकाजवळून जाणाऱ्या जुन्या मांडवी पुलावर बॅरिकेड्स लावून वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बस स्थानकाच्या सर्कलला वळसा घालून अटल पुलाच्या खालून नव्या मांडवी पुलावर जावे लागत आहे.

या बदलांमुळे गर्दीच्या वेळी वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असून पणजीत येणारे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.

Mandovi Bridge Closure
New Mandovi Bridge: नव्‍या मांडवी पुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी! प्रभावी नियोजनाची गरज; पर्यायी मार्गांची आवश्यकता

वाहतूक विभागाचे आवाहन

वाहतूक विभागाने नागरिकांना प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पुलाच्या दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले तरी पुढील आठवडाभर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com