ओल्‍ड गोवा फूडस कंपनीला उत्कृष्ट 'Agro Innovation Award'

केंद्रीय कृषी मंत्रालयाने गोव्याच्या ओल्ड गोवा ऑईल्स अँड फूडस्‌ प्रा. लि. या कंपनीची निवड उत्कृष्ट ॲग्री इनोव्हेशन पुरस्कारासाठी केली आहे
Paresh Shetgaonkar
Paresh ShetgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: केंद्रीय कृषी मंत्रालयाने गोव्याच्या ओल्ड गोवा ऑईल्स अँड फूडस्‌ प्रा. लि. या कंपनीची निवड उत्कृष्ट ॲग्री इनोव्हेशन पुरस्कारासाठी केली आहे. तसेच मॅनेज-समुन्नती ॲग्री-स्टार्टअप पुरस्कार 2022 साठीही या कंपनीची निवड जाहीर झाली आहे. या कंपनीला हा पुरस्कार हैदराबाद येथे येत्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे या कंपनीला रोख एक लाख रू.चा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Paresh Shetgaonkar
Maharashtra: 75 वर्षांवरील वृद्धांचा प्रवास सरकारी बसमधून होणार मोफत

पुरस्कार प्रदान सोहळा राजेंद्रनगर, हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट मॅनेज या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदळाजे, समुन्नती फायनांशियल इंटरमिडिएशनचे संस्थापक अनिलकुमार एसजी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चरल (Agricultural) एक्स्टेंशन मॅनेजमेंटचे सरसंचालक डॉ. पी. चंद्र शेखर उपस्थित राहणार आहेत.

ओल्ड गोवा ऑईल्स यांची उत्कृष्ट इनोवेशन पुरस्कारासाठी ही निवड झाली आहे. हा पुरस्कार त्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे हैदराबाद येथे आयोजिण्यात येणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. आपली उत्पादने ही आंतरराष्ट्रीय प्रमाणित असून त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. याकडे या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक परेश शेटगावकर यांनी लक्ष वेधले आहे.

Paresh Shetgaonkar
Maharashtra Earthquake: तीन दिवसांत 10 वेळा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण!

* सरकारकडूनही सन्मानप्राप्त

या कंपनीच्या उत्पादनांना गोवा सरकारनेही उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित केले आहे. या कंपनीच्या उत्पादनांना पॅरीस, स्पेन, अबुधाबी येथेही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कंपनीला माद्रीद, स्पेन येथे 2020 साली फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन यांचा उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार प्राप्त झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com