CP Radhakrishnan: सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ, धनकड यांनीही लावली हजेरी

CP Radhakrishnan vice president Swearing Ceremony: सी. पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला होता.
CP Radhakrishnan vice president of India
CP RadhakrishnanDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: सी.पी. राधाकृष्णन यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधी समारंभासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री व माजी मंत्री उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिलेले जगदीप धनकड यांनी देखील हजेरी लावली होती.

सी. पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला होता. सी. पी. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली होती तर, इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा ३०० मते मिळाली होती.

CP Radhakrishnan vice president of India
Surla Kulem: सुर्ला, कुळेतील ईको-पर्यटन प्रकल्पांवरील कामे थांबवा! उच्च न्यायालयाचा आदेश; 6 आठवड्यांत मागितला अहवाल

या शपथ समारंभासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा आरोग्य मंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, जगदीप धनकड यांच्यासह अनेक नेते, मंत्री उपस्थित होते.

CP Radhakrishnan vice president of India
Bits Pilani: गोवा बनतेय ‘ड्रग्‍सची राजधानी’! बिट्स पिलानीवरून चिंता व्यक्त; इतर महाविद्यालयांतही तपासणीची मागणी

सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती भवनकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथ कार्यक्रमासाठी एनडीएच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com