Tuye Hospital Project: तुये इस्पितळ डिसेंबरपर्यंत सुरू होणे अशक्य; समितीची माहिती

Tuye Citizen Hospital Committee: मुख्यमंत्र्यांनी हे इस्पितळ निश्चितपणे केव्हा सुरू होईल हे विधानसभा अधिवेशनात जाहीर करावे
Tuye Citizen Hospital Committee: मुख्यमंत्र्यांनी हे इस्पितळ निश्चितपणे केव्हा सुरू होईल हे विधानसभा अधिवेशनात जाहीर करावे
Tuye Citizen Hospital CommitteeDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळाशी संलग्न अशा शंभर खाटांच्या तुये इस्पितळासाठी गेल्या दहा बारा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीत इस्पितळ सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही स्थितीत डिसेंबर महिन्यापर्यंत इस्पितळ सुरू होणे शक्य नाही, असे तुये नागरिक इस्पितळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

याबाबत सोमवारी आम्ही सचिवालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे इस्पितळ निश्चितपणे केव्हा सुरू होईल हे विधानसभा अधिवेशनात जाहीर करावे अशी मागणी करणार आहे, असे तुये नागरिक इस्पितळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला ॲड. प्रसाद शहापूरकर, देवेंद्र प्रभू देसाई, जुझे लोबो, तुयेचे माजी सरपंच तुळशीदास राऊत, चिंतामणी पोळजी, व्यंकटेश नाईक, नामदेव तुळसकर उपस्थित होते. यावेळी ॲड. शहापूरकर म्हणाले, की इस्पितळ सुरू करणार म्हणून पेडणेवासीयांना सरकार गेली दहा बारा वर्षे झुलवत आहे.

मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत हे इस्पितळ सुरू होणार असल्याची केलेली घोषणा चुकीची आहे. या इमारतीचे अद्याप बरेच काम होणे शिल्लक आहे. अद्याप या इस्पितळातील ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग यासारख्या अनेक गोष्टींसाठी निविदाच काढण्यात आलेली नाही. जुझे लोबो यांनीही यावेळी सरकारच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली.

Tuye Citizen Hospital Committee: मुख्यमंत्र्यांनी हे इस्पितळ निश्चितपणे केव्हा सुरू होईल हे विधानसभा अधिवेशनात जाहीर करावे
Tuye Hospital Project : तुये हॉस्पिटल प्रकल्प सुरू करा; नागरिकांची १५ ऑगस्टपर्यंत मुदत

‘जीत आरोलकर यांनी माफी मागावी’

देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, की गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या इस्पितळाचे काम मार्गी लागावे यासाठी दोन्ही मतदारसंघातील आमदारांनी आम्हाला चर्चेस न्यावे अशी अपेक्षा होती, पण दोन्ही आमदारांनी सहकार्य केले नाही. उलट मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पाऊस आल्यावर उगवणारी अळंबी आहेत अशा शब्दात अवहेलना करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळले. त्यामुळे आमदार जीत आरोलकर यांनी पेडणेवासीयांची माफी मागावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com