Congress cm candidate
Congress cm candidateDainik Gomantak

'असा' उमेदवार काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ

बार्देश मध्ये 6 तर मुरगाव तालुक्यात 3 जागा जिंकून काँग्रेस गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सहकार्याने करणार सत्ता स्थापन
Published on

गोव्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा प्रदेश काँग्रेस 20 पेक्षा जास्त जागा जिंकून जनतेची सेवा करणारे सरकार स्थापन करणार असल्याची माहिती अखिल गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी दिली. काँग्रेस पक्ष दक्षिणेत 14 पेक्षा जास्त जागेवर निवडून येणार आहे, तर बार्देश मध्ये 6 व मुरगाव तालुक्यात 3 जागा जिंकून गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाच्या सहकार्याने सत्ता स्थापन करणार आहे. मुख्यमंत्रिपदी कॉंग्रेस पक्षाचे सर्वात जास्त अनुभवी व जेष्ठ सदस्य राज्याचा धुरा सांभाळणार असल्याची माहिती नजीर खान यांनी दिली.

Congress cm candidate
हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी बढतीसाठी गोव्याच्या दोन वकिलांचा समावेश

देशात काँग्रेस (Congress) पक्षाची हवा पसरू लागली असल्याने पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याची माहिती खान यांनी दिली. गोव्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराबरोबर प्रचार करताना जनतेने काँग्रेस पक्षाचे सरकार पुन्हा स्थापन व्हावे म्हणून प्रचारावेळी सांगत होते. राज्यातील जनता भाजप सरकारच्या महागाईला कंटाळली असून यंदाचे सरकार काँग्रेसचे असणार अशी माहिती खान यांनी दिली.

Congress cm candidate
महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गोव्यात काँग्रेस पक्ष दक्षिणेतच 14 पेक्षा जास्त जागा गोवा फॉरवर्ड सहकार्याने जिंकणार असून बार्देश मध्ये प्रथमच काँग्रेस पक्ष इतिहास घडून सहा जागा निश्चित जिंकणार असल्याची माहिती नजीर खान यांनी दिली. मुरगाव (Mormugao) तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत होणार असून या तालुक्यात तीन जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार आहेत. राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचे अनुभवी व जेष्ठ सदस्य होणार असल्याची माहिती शेवटी नजीर खान यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com