

सासष्टी: नुवे मतदारसंघातील माजी आमदार विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान यांनी आज नुवेतील शेतकऱ्यांना पाण्याचे पंप वितरित केले.
याप्रसंगी बाबाशान यांनी सांगितले की, या भागात शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. भातपिकानंतर आता शेतकरी भाजी, फळांची लागवड करतात. त्यांना त्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागते. त्यांचे त्रास कमी व्हावे म्हणून हे पंप त्यांना देण्यात आले आहेत.
लवकरच त्यांना पाईप दिले जातील. या निवडणुकीनंतर बाकी शेतकऱ्यांना पंप दिले जातील. नुवेत जवळ-जवळ १९० शेतकरी आहेत. उपस्थित शेतकऱ्यांनी बाबाशान यांचे आभार मानले.
दरम्यान, विल्फ्रेड डिसा २०१७ साली अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. नंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. सध्या ते आम आदमी पक्षाचा प्रचार करीत आहेत.
पंप अत्यंत उपयोगी!
एका शेतकऱ्याने सांगितले की, आम्ही मिरची, कणंगा, कलिंगड, घोसाळी यांची लागवड करतो. नुवे येथील महामार्गाच्या बाजूला आम्ही त्याची विक्री करतो. बाबाशान यांनी दिलेले पंप आम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.