कार्लूस अल्वारीस फेरेरा आणि अल्टोन डिकोस्टा यांची लोकसभा निवडणुकीसाठी अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी संसदीय मतदारसंघ समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डिचोलीतील आयडीसी परिसरात एका फ्लॅटला आग लागलो. शनिवारी मध्यरात्री लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे किमती साहित्य जळून खाक झाले. तर फाँटमध्ये अडकलेल्या अपूर्ण गौडा यांनी प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर भाव घेतल्याने त्या बचावल्या.
काले येथून होणाऱ्या लोहखनिजाच्या वाहतूकीविरोधात पंचायत सदस्य एकवटले असून त्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध केलाय. ग्रामपंचायत अशा प्रकारांना परवानगी तरी कशी देते असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारलाय. काले येथे रेल्वेच्या माध्यमातून हा माल आणला जात असून तो माल स्थानिक वस्तीजवळ उतरवला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Purple Festival 2024: भाजप सरकार पर्पल फेस्ट 2024 साठी 16 कोटी खर्च करण्याच्या तयारीत असताना, जवळपास 4 महिन्यांपासून बंद असलेले संजय शाळेतील प्रशिक्षण आणि पुनर्वसन केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांवर आझाद मैदानावर धरणे धरण्याची पाळी येणे धक्कादायक व दु्र्दैवी आहे. सदर केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
खाजगी मालमत्तेतील मोबाईल टॉवरला सत्तरीतील म्हाऊस ग्रामसभेत विरोध. टॉवर उभारायचा असेल तर तो देवस्थानाच्या जागेत उभारावा, जेणेकरुन देवस्थानला आर्थिक पाठबळ मिळेल. स्थानिक अनिल गावकार यांचा ठराव ग्रामसभेत संमत.
Euthanasia: मृत्यूशी झुंज देत असलेली व्यक्ती आता आपल्याला कसे मरण पाहिजे याचा निर्णय घेऊ शकते. जगण्याची शक्यता कमी असेल तर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे किंवा उपचार बंद करायचे हे आता आपण ठरवू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात ते मंजूर केले आहे. याबाबत संबंधित डॉक्टर गोवा सरकारची भेट घेऊन नियमावली ठरवतील. तुम्हाला कसा मृत्यू हवा, यासाठी तुम्ही तुमच्या वतीने एखाद्या व्यक्तीला नेमू शकता, जो याबाबत निर्णय देऊ शकेल. डॉ. शेखर साळकर यांची माहिती
Assembly Session: आगामी विधानसभा अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी सोमवारी 8 जानेवारी 2023 रोजी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक दुपारी 3 वाजता बोलावण्यात आली असून त्यानंतर 4.30 वाजता विरोधी पक्ष आमदारांची बैठक विधानसभा संकुल, पर्वरी येथे विरोधी पक्षनेत्यांच्या चेंबरमध्ये बोलविण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची माहिती
Bicholim Fire News: आज (रविवार) मध्यरात्री डिचोलीतील एका फ्लॅटला आग लागली. यामध्ये किमती साहित्याचे नुकसान. आगीत 5 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज. फ्लॅटमधील महिला सुखरूप बचावली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती.
Morjim Accident: मोरजीत तोल जाऊन नाही तर चालत्या कदंबा बसच्या चाकाखाली बिगर गोमंतकीयाची आत्महत्या. पुढील तपास सरू.
Margao Dengue Cases: मडगावात डिसेंबर महिन्याच्या अखेरीस डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये डेंग्यूची लक्षणे असलेले आतापर्यंत 24 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे.
Goa Accident News: राज्यभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात फोंडा तालुक्यातही या घटना सातत्याने वाढत आहेत. तालुक्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाचे प्रमाण वाढले असून, पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होत असली, तरी रस्ते अपघातांमध्ये अजूनही वाढ होत आहे. यामध्ये मागील तीन वर्षांत 78 जणांना जीव गमवावा लागला आहे.
Morjim News: मोरजी मरडीवाडा येथे कदंबा बसमध्ये चढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एकाचा मृत्यू. मृत्यू पावलेला इसम बिगर गोमंतकीय.
North Goa ₹ 97.54
Panjim ₹ 97.54
South Goa ₹ 97.11
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.10
Panjim ₹ 90.10
South Goa ₹ 89.68
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.