Ponda-Sanquelim Municipal Election 2023: आता जोर गाठीभेटी आणि गुप्त बैठकांवर

फोंडा, साखळीत प्रचाराची सांगता ; उद्या मतदान
Ponda And Sanquelim Municipal Council 2023
Ponda And Sanquelim Municipal Council 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda-Sanquelim Municipal Election 2023: साखळी आणि फोंडा पालिकेसाठी शुक्रवारी मतदान होत असून आज, बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली.

शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान शांततेत आणि निर्भयपणे पार पडावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांनी दिली.

प्रचाराची सांगता झाली असली तरी आता गाठीभेटी आणि गुप्त बैठकांना जोर येणार आहे.

साहाय्यक संचालक गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळी पालिकेत १० प्रभागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत. याकरता निवडणूक आयोगाकडून १० मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. तर, फोंडा पालिकेत १३ जागांसाठी ४३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. याकरता २२ मतदान केंद्रे उभारली आहेत.

यासाठीची आयोगाची मतदान यंत्रणा उद्या, गुरुवारी संबंधित केंद्राकडे रवाना होईल. सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.साखळी आणि फोंडा पालिकेची ही निवडणूक पक्षीय पातळीवर नसली तरी काँग्रेस आणि भाजपने आपले पुरस्कृत उमेदवार जाहीर केले आहेत.

तर काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. फोंड्यात भाजपच्या वतीने कृषिमंत्री रवी नाईक यांच्याकडून तर काँग्रेसकडून राजेश वेरेकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. साखळीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीर प्रचार केला होता.

Ponda And Sanquelim Municipal Council 2023
Power Shutdown in Goa: गोव्यात 4 तसेच 5 मे रोजी 'या' भागांमध्ये वीज पुरवठा खंडित

निवडणूक निरीक्षक जाहीर

आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा केली असून साखळीसाठी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मामलेदार राजाराम परब काम पाहणार आहेत.

सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद वळवईकर तर खर्च निरीक्षक म्हणून झिप्रो गावस यांची निवड केली आहे. फोंडा पालिकेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून रघुराज फळदेसाई तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद दलाल यांची निवड केली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल कुंडईकर आणि खर्च निरीक्षक म्हणून सीताराम गावडे काम पाहतील.

Ponda And Sanquelim Municipal Council 2023
North Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषणावर खंडपीठ आक्रमक; पोलिस महासंचालकांना सक्त निर्देश

4 जण बिनविरोध

साखळी पालिकेत काँग्रेस गटाचे प्रवीण ब्लेगन तर भाजप गटाचे रियाज खान बिनविरोध निवडून आले आहेत, तर फोंडा पालिकेत भाजप समर्थक विश्वनाथ दळवी आणि विद्या पुनाळेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत, हे विशेष.

मतदार यादीतून नावे गाळली : याचिका काढली निकाली

साखळी पालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करताना सर्व प्रक्रिया केली. याचिकादार राहात असलेल्या पत्त्यावर ते न सापडल्याने त्यांच्या निवासस्थानी नोटीस लावली होती.

तरीही प्रतिसाद न आल्याने ती मतदार यादीतून वगळल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. नावे वगळल्याप्रकरणी रेहाना बंकापूर व ४० जणांची याचिका गोवा खंडपीठाने आज, बुधवारी निकालात काढली.

दिलेल्या पत्त्यावर मतदार नव्हते

विधानसभा निवडणुकीसाठीची मतदार यादीच पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येते. निवडणुकीपूर्वी सर्वे करतात, त्यावेळी मतदार राहत्या ठिकाणी सापडत नाहीत. त्यामुळे सर्व प्रक्रिया करून अनेक नावे गाळली. त्यामध्ये याचिकादारांचाही समावेश होता. ही नावे गाळल्याचा दावा याचिकादारांनी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com