आता काँग्रेसचे सहा आमदार लवकरच होणार भाजपमय!

लोबोंचाही समावेश : भाजप हायकमांडकडून अद्याप निर्णय नाही
Goa Politics : Congress
Goa Politics : CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नगरनियोजन खात्‍याच्‍या कारवाईमुळे अस्‍वस्‍थ झालेले विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काँग्रेसमधील काही आमदारांसमवेत येथील एका हॉटेलमध्‍ये गुप्‍त बैठक घेतल्‍याची माहिती आहे. हे आमदार लोबोंसमवेत भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍यास इच्‍छुक असून तसे प्रयत्‍न त्‍यांनी सुरू केले आहेत. मात्र अद्याप भाजप हायकमांडकडून हिरवा कंदील दाखविण्‍यात आलेला नाही.

(Now six Congress MLAs will soon join BJP in goa)

Goa Politics : Congress
Photo : गोव्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना गती

विधानसभा निवडणुकीमध्‍ये पुरेसे बहुमत मिळवू न शकलेल्‍या आणि सत्तेपासून वंचित राहिलेल्‍या काँग्रेस आमदारांमधील अस्‍वस्‍थता वाढीस लागली आहे. अशातच नगरनियोजन खात्‍याने विविध ठिकाणी केलेल्‍या जमीन रूपांतराचा मुद्दा पुढे करून कारवाईचे जाहीर संकेत दिले आहेत.

नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी यातील काही भाग उद्या सोमवारी जाहीर करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यात राणे यांचे टार्गेट लोबो हेच असल्‍याने ते प्रचंड अस्‍वस्‍थ आहेत. यासाठीच त्‍यांनी पक्षातील सहा आमदारांसमवेत बैठक घेऊन चर्चा केल्‍याचे वृत्त आहेे. या बैठकीचे नेतृत्‍व लोबो यांनीच केले.

Goa Politics : Congress
बेकायदेशीर मसाज पार्लर, नाईट क्लबवर कारवाई करा: मुख्यमंत्री सावंत

‘त्या’ सहा आमदारांची नावे गुलदस्त्यात

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले आणि आता भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी उत्‍सुक असलेले ‘ते’ सहा आमदार कोण, याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या संभाव्‍य फुटीर दलाचे नेतृत्‍व मूळ भाजपचे असलेले दस्‍तुरखुद्द विरोधी पक्षनेते मायकल लोबो असतील, अशी चर्चा सुरू आहे. मागील विधानसभेतील विरोधी पक्षनेत्‍यांनी अशाच प्रकारचा कित्ता गिरविला होता. त्‍याची पुनरावृत्ती होईल का, असा प्रश्‍न केला जात आहे.

सी. टी. रवी यांच्‍या वक्तव्‍याला पुष्‍टी

गेल्‍याच आठवड्यात भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी भाजपच्‍या आमदारांची संख्‍या लवकरच 30 होईल, असे विधान केले होते. त्‍यांच्‍या या वक्तव्‍याला आज झालेल्‍या या बैठकीमुळे पुष्‍टी मिळाली आहे. शिवाय मंत्री राणे यांनी आपल्‍याला अनेकजण फोन करीत असून, आपण ते फोन घेत नाही, असे वक्तव्‍य केले होते. यावरून काँग्रेसमध्‍ये अस्वस्‍थता वाढल्‍याच्‍या गोष्‍टीला दुजोरा मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com