Goa Kadamba Bus: आता मद्यपी कदंबचालक असतील निशाण्‍यावर!

Goa Kadamba Bus: होणार अल्कोमीटर चाचणी : समुपदेशनही करणार; अपघात रोखण्‍यासाठी उपाययोजना
Kadamba Transport E-Bus
Kadamba Transport E-BusDainik Gomantak

Goa Kadamba Bus: सर्व प्रमुख कदंब बसस्थानकांवर आता मद्यपी चालकांची चाचणी करण्यासाठी अल्कोमीटरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. कदंब वाहतूक महामंडळाने संचालक मंडळाच्या बैठकीत मद्यपी चालकांचे समुपदेशन करण्‍याचा निर्णय घेतला असल्याचे महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले.

Kadamba Transport E-Bus
Goa Accident Case: बसच्‍या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

अलीकडेच काही कदंब बसचालक दारूच्या नशेत रात्रीच्या वेळी बेशिस्तपणे गाडी चालवताना आढळून आले आहेत. भविष्‍यातील संभाव्‍य अपघात टाळण्यासाठी सरकारने या प्रकरांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. याची दखल घेत केटीसीएलने आज सोमवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलावली.

Kadamba Transport E-Bus
Illegal Construction: ‘मिकीज’ रेस्‍टॉरंटवर फिरणार बुलडोझर!

या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी सर्व प्रमुख कदंब बसस्थानकांवर अल्कोमीटर ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच बसचालक दारूच्‍या नशेत असल्‍याचा प्रवाशांना संशय आला तर त्‍यांनाही त्‍याची अल्कोमीटर चाचणी घेण्याची सूचना करता येईल, असे संजय घाटे यांनी सांगितले. वाढते रस्‍तेअपघात टाळणे हेच या मोहिमेचे उद्दिष्‍ट्य आहे, असेही ते म्‍हणाले.

मद्यपी चालकांचे समुपदेशन करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे वाहनचालकांना त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्याबरोबरच दारूच्या व्यसनावर मात करण्यास मदत होईल. असे समुपदेशन केल्याने अपघात कमी होण्‍यास मदत होईल.

- संजय घाटे, महाव्‍यवस्‍थापक, कदंब वाहतूक महामंडळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com