Canacona News : जमीन संपादनासाठी 75.46 कोटी मंजूर

बेंदुर्डे ते चाररस्तापर्यंतचा रस्ता : दोन टप्प्यांत भूसंपादन करा; केंद्राची राज्याला सूचना
 Road Construction
Road ConstructionGomantak Digital Team
Published on
Updated on

Canacona News : बेंदुर्डे ते चाररस्तापर्यंतच्या चारपदरी रस्त्याच्या बांधणीसाठी जमीन संपादनासाठी 75.46 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. दोन टप्प्यांत भूसंपादन पूर्ण करण्याची केंद्रीय रस्ता मंत्रालयाने गोवा सरकारला सूचना केली आहे.

बेंदुर्डे येथील 64,421 चौरस मीटर जमीन संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी जमीनमालकांना 120 रुपयेप्रमाणे प्रतिचौरस मीटर मोबदला देण्यात येणार आहे. कोर्डे येथील 63,077 चौ.मी., बार्शे येथे 70,381.40 चौ.मी., पाडी येथे 1,737.96 चौ.मी., नगर्से येथे 30,437.79 चौ.मी. जमीन संपादन करण्यात येईल. त्यासाठी जमीनमालकांना 240 रुपये प्रतिचौरस मीटर मोबदला देण्यात येईल.

 Road Construction
काणकोण हांगा रस्त्याचे हॉटमिक्सिंगचे काम सुरू | Road hotmixing begins at Canacona | Gomantak Tv

काणकोणमध्ये 46,564 चौ.मी. जमीन संपादन करण्यात येईल. जमीनमालकांना प्रतिचौरस मीटर 300 रुपये मोबदला देण्यात येईल. चारपदरी रस्त्यासाठी एकूण 2 लाख 92 हजार 308 चौ.मी. जमीन संपादन करण्यात येईल.

त्यासाठी 13 कोटी 9 लाख 56 हजार 686 रुपये खर्च करण्यात येतील. या मार्गातील बांधकामे व वृक्षांसाठी 3.5 कोटी रुपयांची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात 2023-24 आर्थिक वर्षात एकूण खर्चाच्या 40 टक्के रक्कम म्हणजे 30.624 कोटी रुपये खर्च करण्यात येतील तर 2024-25 आर्थिक वर्षात उर्वरित 60 टक्के म्हणजे 44.836 कोटी रुपये वापरण्यात येतील.

 Road Construction
Building Permit : इमारत परवाना मंजुरीस वेळेचे निर्बंध; 60 दिवस उलटले तर थेट मान्यता

चौपदरीकरणासाठी सर्वेक्षण

यापूर्वी करमलघाट ते बेंदुर्डेपर्यंत चारपदरी रस्ता काढण्यासाठी चार हजारपेक्षा जास्त वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने काही पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे दाद मागितली होती. वृक्ष कत्तल न करण्यासाठी करमल घाटात भुयारी मार्ग काढण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता.

मात्र, तो पर्याय जास्त खर्चिक व करमलघाटातील मृदा भुयारी मार्गासाठी योग्य नसल्याने सध्याच्या महामार्गाला समांतर चारपदरी रस्ता काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे या चारपदरी रस्त्याची बांधणी दृष्टिक्षेपात आल्यानंतर बेंदुर्डे व बाळ्ळी येथे दोन पेट्रोल पंप उभारणीचे काम सुरू झाले आहे.

 Road Construction
Building Collapsed In Lucknow: लखनौमध्ये मोठी दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू; 20 हून अधिक...!

वळणांचे रुंदीकरण गरजेचे

करमलघाटातील धोकादायक वळणांवर आठवड्याला सध्या किमान एक वाहन अपघातग्रस्त होत आहे. चारपदरी रस्ता बांधणीसाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यापूर्वी करमलघाटातील धोकादायक वळणांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा चारपदरी रस्ता होईपर्यंत अपघाताची शृंखला चालूच राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com