Building Collapsed In Lucknow: लखनौमध्ये मोठी दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू; 20 हून अधिक...!

Hazratganj Building Collapsed: लखनौमध्ये मंगळवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. चार मजली इमारत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक लोक गाडले गेल्याची भीती आहे.
Major Accident In Lucknow
Major Accident In Lucknow Dainik Gomantak
Published on
Updated on

Building Collapsed in Lucknow: लखनौमध्ये मंगळवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. चार मजली इमारत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक गाडले गेल्याची भीती आहे.

आतापर्यंत सात जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. हजरतगंजच्या वजीर हसन रोडवर असलेल्या अलया अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. सीएम योगींनीही त्याची दखल घेतली आहे. मदत आणि बचावासाठी अधिकाऱ्यांना अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि नगरविकास मंत्री एके शर्माही घटनास्थळी पोहोचले आहेत. ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. तीन मृतदेह सापडले आहेत.

एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ मदतकार्यात गुंतले आहेत. या इमारतीच्या तळघरात काही दिवस काम सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे. मदतीसाठी जेसीबीही मागवण्यात आला आहे.'

Major Accident In Lucknow
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

याशिवाय, घटनास्थळी अनेक रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी रुग्णालये आणि रक्तपेढ्यांनाही सतर्क केले आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना केजीएमयू आणि बलरामपूर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफसोबत पोलीस (Police) कर्मचारीही ढिगारा हटवण्यात गुंतले आहेत. जेसीबी आतमध्ये पाठवता यावा यासाठी सर्वप्रथम मार्ग मोकळा करण्यात येत आहे.

Major Accident In Lucknow
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नवी अपडेट, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

त्याचबरोबर, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते हैदर अब्बास यांचे कुटुंबीयही या इमारतीत राहत होते. यावेळी कुटुंबीय उपस्थित होते. तसेच उमा फातिमाचे वडील युसूफ, आई आणि भाऊ हनी फ्लॅटमध्ये होते. त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com