North Goa Police: निधीन वल्सन यांच्या पेट्रोलिंग मोहीमेमुळे उडाली वाहनचालकांची तारांबळ; अनेकांवर गुन्हा दाखल

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वल्सन यांनी मंगळवारी संध्याकाळी हणजूण येथे अचानक पेट्रोलिंग मोहीम राबवली.
Nidhin Valsan
Nidhin Valsan Dainik Gomantak
Published on
Updated on

North Goa Police: उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वल्सन यांनी मंगळवारी संध्याकाळी हणजूण येथे अचानक पेट्रोलिंग मोहीम राबवली. यावेळी अनेक वाहनचालक नियम पाळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अनेक वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

Nidhin Valsan
Smart City Panaji : राजधानीत ‘स्मार्ट’ गोंधळ; महिनाअखेर 13 प्रकल्पपूर्तीचे उद्दिष्ट

एसपी उत्तरसह म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी, हणजूण पीआय प्रशाल देसाई आणि हणजूण पोलिसांशी संलग्न पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवली.

"संध्याकाळच्या वेळी आयोजित केलेल्या मोहिमेदरम्यान नाकाबंदी तैनात करण्यात आली होती आणि अनेक वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा, सार्वजनिक धूम्रपान इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला," असे मात्र जिवबा दळवी यांनी व्यक्त केले.

ड्युटीवरील कर्मचार्‍यांनी खात्री केली की कोणीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळणार नाही आणि कायद्यानुसार कारवाई सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर गोवा पोलिसांच्या या अचानक पेट्रोलिंगमुळे किनाऱ्यावर मजामस्ती करायला आलेल्यांची मात्र तारांबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Security Guards Theft Case
Jambavali Dhyan Foundation Goshala
Fake Traffic Challan Scam
 Goa Facebook Part Time Job Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com