Smart City Panaji : राजधानीत ‘स्मार्ट’ गोंधळ; महिनाअखेर 13 प्रकल्पपूर्तीचे उद्दिष्ट

त्यातच जी-२० परिषदेची कामे
Smart City Panaji
Smart City PanajiDainik Gomantak

Smart City Panaji: खोदलेले रस्ते, उडणारा धुरळा, मशिनरीची घरघर, वाहतुकीची प्रचंड कोंडी, मुले-रुग्ण-वृद्ध यांना वेळेत न मिळणाऱ्या अत्यावश्यक सुविधा, त्यातून निर्माण होणारा गोंगाट हे सारे सध्या राजधानी पणजी नित्य अनुभवते आहे. कारण येथे सुरू आहे ‘स्मार्ट सिटी’चे काम.

त्यातच आता सुरू झालेली जी-20 परिषदेची कामे आणि दुरुस्तीसाठी बंद ठेवलेला अटल सेतू यांमुळे पणजीकर आणि पर्यटकांचा श्वास गुदमरतोय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावर प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होत असल्याची कबुली देत सुरू असलेल्या कामांची जंत्रीच मांडली.

राज्यात नगर विकास मंत्रालयाच्या वतीने 25 जून 2015 रोजी स्मार्ट सिटी मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. 2019-23 यादरम्यानच्या प्रकल्पासाठी राजधानी पणजीची निवड झाली. मात्र, सुरुवातीच्या काळातील वगळता इतर कामे झालीच नाहीत.

Smart City Panaji
Mapusa Drug Case: साळगावात गांजा विक्री प्रकरणी बिहारच्या 19 वर्षीय युवकाला अटक

केंद्र आणि राज्य सरकारच्या 50-50 टक्के शेअरिंग तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी पणजीसाठी 930 कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत.

या स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य महाव्यवस्थापक विजयकुमार होनवाड म्हणाले, या प्रकल्पांतर्गत जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम, साधनसुविधा विकास महामंडळ, वीज, जी-सुडा अशी अनेक खाती आणि विभाग एकत्रितपणे काम करत आहेत.

एकूण २४ पैकी १३ कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करायची आहेत, तर जून २०२३ पर्यंत आणखी चार प्रकल्प पूर्ण करायचे आहेत.

या वर्षाच्या अखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मध्यंतरी कोरोनामुळे काही कामे होऊ शकली नाहीत. आता जी-20 शिखर परिषदेमुळे काही कामे बंद करावी लागत आहेत.

सध्या जी-20 साठी सुरू असलेली कामे आणि स्मार्ट सिटीची कामे यांमुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने रस्त्यावरच कामे सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.

Smart City Panaji
Goa Pre-Monsoon Work: गोव्यातील मान्सूनपूर्व कामांना तब्बल 2 महीने उशीर; महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले...

सध्या सुरू असलेली कामे

 • पणजी-रायबंदर मार्गावरील वीज खांब नूतनीकरण

 • स्मार्ट सिटी विभागाची निर्मिती

 • सांतिनेज नाला सुशोभीकरण

 • सांतिनेज परिसरात सात पूल उभारणी

 • मिरामार वाहनतळ सुशोभीकरण

 • मिरामार किनारा, ईएसजी बिल्डिंग, मांडवी नदी परिसर नूतनीकरण

 • रायबंदर मासे मार्केट विकास

 • रस्त्यावरील वीज यंत्रणा पुनर्निर्मिती

 • पाटो-पणजी परिसरात प्रशस्त उद्यान आणि लॅण्डस्केपिंगचा प्रस्ताव

 • स्मार्ट क्लासरूम्स उभारणी

 • मास्टर प्लॅननुसार वाहनतळ उभारणी

 • मळा पूर नियंत्रण पंपिंग स्टेशन उभारणी

 • ‘जी-सुडा’अंतर्गत २४ तास पाणीपुरवठा

योजनेचे उद्दिष्टे

 • जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था

 • २४ तास वीज-पाणी

 • शहरांतर्गत कामांसाठी ‘सिंगल विंडो’

 • एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ४५ मिनिटांत जाणे शक्य

 • स्मार्ट शिक्षण व्यवस्था

 • पर्यावरणपूरक वातावरण

 • उत्तम आरोग्य, सुरक्षा, मनोरंजन सुविधा

पणजी शहरात सध्या टप्प्याटप्प्याने कामे सुरू आहेत. पण एकूणच कामाचा व्याप वाढल्याने गर्दी, गोंगाट आणि वाहतूक कोंडी झाली आहे. मात्र, लवकरच ही परिस्थिती सुधारेल. शिवाय लोकांना चांगल्या सुविधाही मिळतील.

- बाबूश मोन्सेरात, आमदार, पणजी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com