Tenant Verification Goa: उत्तर गोवा पोलिसांची मोठी मोहीम! प्रतिबंधात्मक पोलीसिंगला धार; 66 हजारांहून अधिक भाडेकरुंची पडताळणी

Tenant Verification In North Goa: उत्तर गोवा पोलिसांनी जिल्ह्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक पोलीसिंग उपायांवर लक्ष केंद्रित केले.
Tenant Verification
Tenant Verification Dainik Gomantak
Published on
Updated on

Tenant Verification In North Goa: उत्तर गोवा पोलिसांनी जिल्ह्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक पोलीसिंग उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

भाडेकरु, नोकर आणि कामगारांची पडताळणी

उत्तर गोवा पोलिसांनी (Goa Police) यावर्षी भाडेकरु आणि कामगारांच्या पडताळणीवर विशेष भर दिला. या वर्षी आतापर्यंत 66,479 भाडेकरु आणि 33,123 नोकर/कामगार यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्वतः पिळर्ण परिसरात केलेल्या एका तपासणी मोहिमेदरम्यान, संशयाच्या आधारावर पश्चिम बंगालमधील 13 भाडेकरुंना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक अटक करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच, भाडेकरु पडताळणी न करणाऱ्या एका घरमालकावरही 'भाडेकरु पडताळणी कायद्या'अंतर्गत योग्य ती कार्यवाही सुरु करण्यात आली.

Tenant Verification
Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

'गोवा पोलीस ॲप'द्वारे आधार-आधारित ऑनलाइन पडताळणी प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून आतापर्यंत 1250 हून अधिक भाडेकरुंची पडताळणी झाली. पडताळणी न झालेल्या भाडेकरु किंवा तात्पुरत्या रहिवाशांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके त्वरित ओळखण्यास या उपायांमुळे मदत मिळत आहे.

नियमित नाकाबंदी आणि रात्रीची तपासणी

जिल्ह्यात रात्रीच्या वेळी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस सक्रिय झाले आहेत. दररोज रात्री सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार, जिल्ह्यामध्ये 30 हून अधिक ठिकाणी धोरणात्मक नाकाबंदी केली जात आहे. पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी या तपासण्यांवर सक्रियपणे लक्ष ठेवून असतात. ते स्वतः फिल्डवर राहून रात्रीची गस्त, वाहन तपासणी आणि संभाव्य गुन्हेगारांना रोखण्यासाठी क्षेत्रात उपस्थित राहतात. या नाकाबंदी आणि रात्रीच्या तपासणीतून या वर्षी आतापर्यंत 90,000 हून अधिक वाहने आणि 2 लाख लोकांची पडताळणी करण्यात आली आहे. गस्त घालणाऱ्या वाहनांनी किती क्षेत्रात गस्त घातली, हे तपासण्यासाठी 'किलोमीटर रिडिंग'चेही निरीक्षण केले जात आहे.

Tenant Verification
Goa Tenant Verification: उत्तर गोवा पोलिस अ‍ॅक्शनमोडवर! भाडेकरु पडताळणी मोहिमेस पुन्हा वेग; बेकायदा राहणाऱ्यांची खैर नाही

स्क्रॅप यार्ड आणि भंगारवाल्यांवर लक्ष्य

चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्याची ठिकाणे असलेल्या स्क्रॅप यार्ड आणि भंगारवाल्यांवर विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत 105 स्क्रॅप यार्ड्स आणि 221 भंगारवाल्यांची पडताळणी करण्यात आली. एका भंगारवाल्याकडे बनावट आधार कार्ड आढळल्याने, त्याच्यावर त्वरित एफआयआर नोंदवण्यात आला. या सर्व प्रतिबंधात्मक पोलीसिंग उपायांमुळे या वर्षात आतापर्यंत एकूण 3596 प्रतिबंधात्मक अटक करण्यात आल्या आहेत.

Tenant Verification
Tenant Verification Goa: भाडेकरू पडताळणीचा शेवटचा दिवस; राहिलेल्यांनी त्वरित नोंदणी करावी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

उत्तर गोवा (North Goa) पोलीस जिल्हा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी 'गोवा पोलीस ॲप' वापरून भाडेकरु आणि कामगारांची पडताळणी करावी, असे आवाहन केले. तसेच, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे किंवा 112 डायल करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com