Panaji News : डिचोली,सत्तरी तालुक्यात राणे दाम्‍पत्‍य, मुख्‍यमंत्र्यांचा करिष्मा

Panaji News : सत्तरीतून ३२,८६३, साखळीतून १५,७६४ श्रीपादना मताधिक्‍य
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे श्रीपाद नाईक यांना विजय मिळवून देण्यात सत्तरी व डिचोली तालुक्याने महत्वाची भूमिका बजावली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतून तर मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सत्तरी तालुक्यातील पर्ये व वाळपईतून मोठे मताधिक्य नाईक यांना मिळवून दिले. यामुळे हे दोन्ही नेते त्यांच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार म्‍हणावे लागतील.

डिचोली तालुक्यातील मये मतदारसंघातून १० हजार ७५८ मतांची आघाडी नाईक यांना मिळाली. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी भाजपचा गड राखल्याचे यावरून दिसते. साखळीत १५ हजार ७६४, पर्येत १९ हजार ९५८ तर वाळपईत १२ हजार ९०५ मतांची आघाडी नाईक यांना मिळाली आहे. प्रियोळचे प्रतिनिधीत्व मंत्री गोविंद गावडे करतात.

Panaji
Goa Monsoon 2024: गोव्यात मॉन्सून वेळेत दाखल, लोकसभा निकालादिवशी राजधानातील रस्ते जयमल

या मतदारसंघात ११ हजार २६७ मतांची आघाडी त्यांनी नाईक यांना मिळवून दिली. यापैकी मगोची मते किती हे अद्याप समजू शकलेले नाही. थिवीत केवळ ४ हजार ९२६ मतांचीच आघाडी मिळाली. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व मंत्री नीळकंठ हळर्णकर करतात.

म्हापशाचे प्रतिनिधीत्व उपसभापती जोशुआ डिसोझा हे करत असूनही तेथे केवळ ४ हजार १६० मतांची आघाडी ते देऊ शकले. शिवोलीत माजी मंत्री दयानंद सोपटे व आमदार दिलायला लोबो हे दोन मोठे नेते आहेत. मात्र तेथे भाजपला केवळ २ हजार १३१ मतांची आघाडी मिळाली.

पर्वरीत मंत्री रोहन खंवटे यांनी ५ हजार ६९५ मताधिक्य दिले. तर, मांद्रेत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दयानंद सोपटे व आमदार जीत आरोलकर हे भाजपच्या बाजूने असतानाही केवळ ४ हजार ४०५ मतांचीच आघाडी नाईक यांना मिळू शकली. पेडण्यातून मात्र आमदार प्रवीण आर्लेकर व मगोचे राजन कोरगावकर यांनी ७ हजार ९४७ एवढे तर डिचोलीत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी ९ हजार ७२९ मताधिक्य दिले आहे.

Panaji
North Goa Constituency: उत्तर गोव्याची उमेदवारी उशिरा जाहीर करणं काँग्रेसला पडलं महागात; भाजपच्या नाईकांना फायदा

लोबो, टिकलो, रुडॉल्‍फ, सिल्‍वेरा ठरले अपयशी

कळंगुटमधून भाजपला मताधिक्य मिळवून देण्यात आमदार मायकल लोबो यांना अपयश आले आहे. हळदोण्यातून माजी आमदार ग्लेन टिकलो हेसुद्धा मताधिक्य देऊ शकले नाहीत. सांताक्रुझमध्ये आमदार रुडॉल्फ फर्नांडिस हे आपली मते भाजपकडे वळवू न शकल्याने नाईक यांना या मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही.

सांतआंद्रेतही भाजपला मताधिक्य मिळवून देण्यात माजी आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा यांचे प्रयत्न तोकडे पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com