Loksabha Result : मतमोजणीसाठी ३५९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती ; १ वाजेपर्यंत दोन्ही निकाल शक्य

Loksabha Result : मतमोजणीवेळी सुरक्षेसाठी थ्री टायर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बाहेरच्या गेटवर गोवा पोलिस, त्याच्या आत आयआरबी पोलिस तर मतमजोणी केंद्राच्याबाहेर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान असतील.
Loksabha Result
Loksabha Result Dainik Gomantak

Loksabha Result :

पणजी, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी उत्तर गोव्यासाठी १७९३ कर्मचारी तर दक्षिणेसाठी १,७९७ कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये निरीक्षक, सुपरवायझर, मोजणी साहाय्यक, निवडणूक अधिकारी कर्मचारी, साहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी, निवडणूक एजंट याचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उत्तरेत ७०६ तर दक्षिणेत ६५१ पोलिस कर्मचारी असतील.

मतमोजणीवेळी सुरक्षेसाठी थ्री टायर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बाहेरच्या गेटवर गोवा पोलिस, त्याच्या आत आयआरबी पोलिस तर मतमजोणी केंद्राच्याबाहेर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान असतील.

या मतमोजणीवेळी सीसी टीव्ही कॅमेरा तसेच प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीच्या फेरीअंती मतांची माहिती जाहीर केली जाणार. दोन्ही जिल्ह्यात मतमोजणीच्या ठिकाणी २० मतदारसंघासाठी २० सभागृह असून प्रत्येक सभागृहाच्या आकारानुसार १४ ते ७ टेबल्स मोजणीसाठी मांडण्यात आली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मतमोजणीची ७ राऊंड होणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातील पाच केंद्रावरील व्हीव्हीपॅट स्लिप्स मोजल्या जाणार आहेत. ही मतमोजणी सकाळी ८ वा. सुरू होऊन दुपारी १ वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

Loksabha Result
Goa Loksabha Result : साखळीत भाजपची विजयोत्सवाची तयारी; विविध ठिकाणी स्क्रीन

भाजपने दक्षिणेत महिला उमदेवार उतरवल्याने त्यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांना तसेच आमदार व मंत्र्यांना घाम काढावा लागला होता. ही लढत भाजप विरुद्ध इंडी आघाडी अशीच झाली आहे. भाजपला उत्तरेतील तर इंडी आघाडीला दक्षिणेतील जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. जर इंडी आघाडीला दक्षिणेत यश मिळाल्यास ते जनतेचे त्याचबरोबर विरोधी पक्षानी दाखविलेल्या एकजुटीचे असणार आहे.

आज सकाळी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी पोलिस उपअधिक्षक संतोष देसाई, पोलिस उपअधिक्षक राजेंद्र प्रभूदेसाई, पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक व इतर अधिकारी उपस्थित होते.

दक्षिण गोव्यात दामोदर महाविद्यालयात मतमोजणी

लोकसभा निवडणुकीची दक्षिण गोवा मतदारसंघाची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून विद्या विकास मंडळाच्या श्री दामोदर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात सुरुवात होत आहे. उद्याच्या मतमोजणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून आज दिवसभरात पोलिस अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी व इतर संबंधित खात्याचे अधिकारी तयारीवर अंतिम हात फिरवत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com