मयडे येथे सुरू असलेल्या डोंगर पोखरण्याच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस

मयडे येथे सुरू असलेल्या डोंगर पोखरण्याच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस
Dainik Gomantak
Published on
Updated on

मयडे, बार्देश सर्व्हे नंबर 10/1 येथे (Moira, Bardez) एका प्रकल्पासाठी डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. या कामाला उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने काम थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे. अवैध डोंगर पोखरण्याबाबत भरारी पथकाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे. नगर नियोजन विभागाकडून यासंबधीची कोणतीही परवानगी नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बायणा बीच येथील विकास कामाला स्थगिती

बायणा बीच, वास्को येथील हाय टाईड लाईनच्या शंभर मीटर अंतरात येणाऱ्या विकास कामाला, राष्ट्रीय हरित लवादने स्थगिती दिली आहे. नो डेव्हलपमेंट झोनच्या आत येणारे काम किंवा झालेले काम तीन महिन्यात हटविण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादने दिले आहेत.

मयडे येथे सुरू असलेल्या डोंगर पोखरण्याच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस
Goa Corona Update: गोव्यात आज 180 नवे कोरोना रूग्ण, एक मृत्यू

पिसुर्लेतील ‘डम्प’मध्ये लोहासह सोन्याचा अंश

पिसुर्ले येथील खाणींमधून निर्यात करण्यात आलेल्या खनिज डम्पच्या नमुन्यात सोने 41.13 व 29 टक्के लोह असल्याचे स्पष्ट झाले. याचिकादाराने मुंबईतील प्रतिष्ठित सेरालॅबमध्ये पाठविलेल्या खनिज डम्पच्या नमुन्याच्या तपासणीत लोहाबरोबर सोन्याचे अंशही असल्याचे नमूद केले.

मयडे येथे सुरू असलेल्या डोंगर पोखरण्याच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस
Goa Mining : पिसुर्लेतील ‘डम्प’मध्ये लोहासह सोन्याचा अंश

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com