Goa Mining : पिसुर्लेतील ‘डम्प’मध्ये लोहासह सोन्याचा अंश

‘सेरालॅब’चा अहवाल : प्रतिकिलो सोन्याचे प्रमाण 46.70 मिलीग्रॅम; खंडपीठात माहिती
Mining in Goa
Mining in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mining : पिसुर्ले येथील खाणींमधून निर्यात करण्यात आलेल्या खनिज डम्पच्या नमुन्यात सोने 41.13 व 29 टक्के लोह असल्याचे स्पष्ट झाले. याचिकादाराने मुंबईतील प्रतिष्ठित सेरालॅबमध्ये पाठविलेल्या खनिज डम्पच्या नमुन्याच्या तपासणीत लोहाबरोबर सोन्याचे अंशही असल्याचे नमूद केले.

या नमुन्यामध्ये लोहचे प्रमाण 29 टक्के तर सोन्याचे प्रमाण 46.70 मिलीग्रॅम प्रति किलो म्हणजेच 46.70 ग्रॅम प्रति टन असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गोवा खंडपीठाने डम्पच्या नमुन्यात असलेल्या सोन्याचे अंशाबाबत सरकारची भूमिका सादर करण्याची निर्देश देत सुनावणी 23 ऑगस्टला ठेवली आहे. या खनिज डम्पमध्ये सोन्याचे अंश असल्याचे अहवालाने खंडपीठही आश्‍चर्यचकित झाले.

पिसुर्ले येथील खाणपट्ट्याच्या क्षेत्रातील खनिज डम्पचा लिलाव जानेवारी 2022 मध्ये करण्यात आला. त्याच्या कायदेशीरपणाला गोवा फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या खनिज डम्पमध्ये असलेले नैसर्गिक संसाधने यासंदर्भातची माहिती उपलब्ध करण्यात आली नव्हती. खाण खात्याने तेथील खनिज डम्प नमुना 15 डिसेंबर 2021 रोजी पिसुर्ले येथील जागेतून घेतला होता. मात्र, तो खनिज डम्पच्या नमुन्याची तपासणी लिलाव करण्यापूर्वी करण्यात आली नव्हती. लिलावानंतर खाण खात्याने इटालॅब या खासगी प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या खनिज डम्पच्या नमुन्याचा अहवाल 12 एप्रिल 2022 आला त्यामध्ये 41.13 टक्के लोह व 39.85 टक्के सिलिका असल्याचे नमूद केले होते.

याचिकादाराने पिसुर्ले येथील खनिज डम्पचा नमुना मे 2022 मध्ये घेतला व मुंबईतील सेरालॅबमध्ये तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल 12 जून 2022 रोजी आला.

Mining in Goa
Gauri Achari Murder : गौरी अचारीच्या मारेकऱ्याची गोवा पोलिसांच्या ट्रेनिंगसाठी नेमणूक

त्यावेळी सरकारकडून दुर्लक्ष

यापूर्वी गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी खाणीमध्ये सोन्याचे अंश असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी संबंधित अधिकारिणीने त्याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाही. खाण खात्याने खनिज डम्पच्या नमुन्याची तपासणी करताना फक्त लोह व सिलिका याचेच प्रमाण मोजले. त्यातील सोन्याच्या अंशाचा विचारही केला नाही.

जगात सर्वाधिक प्रमाण!

खाणीमध्ये उच्चत्तम सोन्याचे अंश 8 ते 10 ग्रॅम प्रति टन तर किमान 1 ते 4 ग्रॅम प्रति टन आढळून येतात. इतर देशांमध्ये खनिजसोबत सापडणाऱ्या सोन्याचे अंश अधिकाधिक 44.1 ग्रॅम प्रति टन आहे. ‘सेरालॅब’नुसार गोव्यात खनिज डम्पमध्ये आढळून आलेले सोन्याचे अंशचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, असे गोवा फाऊंडेशनने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com