गोवा विधानसभा निवडणुकीत 2 अल्पसंख्यांकांना उमेदवारी द्या: नजीर खान

गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) पुढील वर्षी होणार असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आपले आठ उमेदवार सर्वप्रथम जाहीर केले आहे.
Nazir Khan Goa Assembly Election

Nazir Khan Goa Assembly Election

Dainik Gomantak

Published on:
Updated on:

वास्को: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोवा प्रदेश काँग्रेस समितीने 2 अल्पसंख्यांकांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी केली आहे. तसेच वास्कोत काँग्रेसची उमेदवारी वरिष्ठ अधिकारी ज्या कोणाला देणार त्याला येथील अल्पसंख्यांक पाठिंबा देणार असल्याची माहिती नजीर खान यांनी दिली आहे.

Nazir Khan Goa Assembly Election

त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा दाबोळी विमानतळावर उपोषण करू: टॅक्सी चालक

गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) पुढील वर्षी होणार असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आपले आठ उमेदवार सर्वप्रथम जाहीर केले आहे. मात्र, राज्यातील इतर पक्षांनी अजूनही आपले उमेदवार जारी केलेले नाही. यामुळे सध्या राज्यात पाहिजे त्याप्रमाणे राजकीय वातावरण तापलेले नाही. राज्यात काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी इतर पक्षात पक्षांतर केले तर भाजपच्या काही आमदारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणात बदल झालेला आहे. तसेच आम आदमी पक्षा बरोबर तृणमूल काँग्रेसने (TMC) सुद्धा राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षात घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप पडलेला आहे.

Nazir Khan Goa Assembly Election

गोव्यातही नाईट कर्फ्यू लागू करावा, पण...

गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक कार्यालयाला भेट दिली असता त्याने गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांकांना काँग्रेस (Congress) पक्षाची दोन उमेदवारी देण्याची मागणी केली होती. याविषयी नजीर खान यांना विचारले असता, खान यांनी सांगितले की गोव्यात अल्पसंख्यांकाचे विषय मी दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस पुढाकाऱ्यां समोर मांडला. यात त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य केले. तसेच गोवा प्रदेश काँग्रेस समितीने राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका निवडणुकीत दोन उमेदवारी अल्पसंख्यांकांना देण्याची मागणी नजीर खान यांनी केली असून काँग्रेसने वरिष्ठ अधिकारी यावर योग्य तो निर्णय घेणार आहे. वास्कोतील काँग्रेसची उमेदवारी माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत किंवा माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यापैकी कुणालाही दिल्यास अल्पसंख्यांक त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याची माहिती खान यांनी दिली. शेवटी अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा असून त्यांच्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करणार अशी माहिती नजीर खान यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com