त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा दाबोळी विमानतळावर उपोषण करू: टॅक्सी चालक

दाबोळी विमानतळावर आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Taxi drivers gathered at Dabolim Airport

Taxi drivers gathered at Dabolim Airport

Dainik Gomantak 

Published on
Updated on

वास्को: दाबोळी विमानतळावरील काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकाला येथील ताज काऊंटर वरील कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने आज विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत ह्या गुंडागर्दीला आळा घालत नाही, तसेच त्या कर्मचाऱ्यावर उद्यापर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही विमानतळावर उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांनी दिला आहे. तसेच बेकायदेशीर भाडे मारण्यावरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>Taxi drivers gathered at Dabolim Airport </p></div>
विनयभंग करणारा आरोपी अखेर गजाआड !

दाबोळी (Dabolim) आंतरराष्ट्रीय विमानतळ या ना ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. जास्त म्हणजे काळ्या पिवळ्या टॅक्सीवाल्यांचा विषय ऐरणीवर असतो. असाच प्रसंग रात्री घडला, विमानतळावरील (Airport) ताज काऊंटरवरील एका कर्मचाऱ्याने येथील काळ्या पिवळा टॅक्सी चालकाला मारहाण केल्याने त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्याची पाळी आली. दरम्यान या विषयी माहिती इतर टॅक्सी चालकांना मिळताच त्यांनी आज विमानतळ परिसरात जमून याविषयी पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच उद्यापर्यंत या कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास सर्व टॅक्सी विमानतळावर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी दिला.

<div class="paragraphs"><p>Taxi drivers gathered at Dabolim Airport </p></div>
'म्हादई विकणे अन् खाण बंद करण्याला सुशासन म्हणतात का': सरदेसाई

दरम्यान, या टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रसाद प्रभूगावकर यांनी बोलताना दाबोळी विमानतळावर काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांवर (Taxi driver) विविध तऱ्हेने अन्याय होत आहे. यांच्यावर ताबा नाही. आम्ही येथे कायदेशीर आहोत. मात्र, विनापरवाना टॅक्सी चालकांकडून लुटमार केली जाते. पोलिसांकडे (Police) याविषयी तक्रारी केल्या, मात्र पोलीस दल मोठ्या प्रमाणात नसल्याने कारवाई होत नाही, मग पुन्हा विनापरवाना टॅक्सीवाले आपल्या छुप्या मार्गाने व्यवसाय चालवतात यावर ताबा राहिलेला नाही. तसेच रेंट अ कार सर्रासपणे विमानतळ परिसरात गाड्या उभ्या करून भाडे चोरून नेतात. कायद्यानुसार त्यांना दाबोळी विमानतळ परिसर तसेच अन्य ठिकाणी राहण्याची परवानगी नसताना ते बेकायदेशीररित्या आपला व्यवसाय चालवतात. त्यांच्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे असे प्रभुगावकर म्हणाले. तसेच ताज काऊंटर वरील कर्मचाऱ्यावर उद्यापर्यंत कारवाई होत नसेल तर आम्ही दाबोळी विमानतळावर उपोषणास बसणार असल्याचा इशारा काळ्या पिवळ्या चालकांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com