मामलेदार इमारतीला लिफ्ट नसल्याने सांगेवासीयांची गैरसोय

माजी मंत्री पांडू वासू नाईक यांच्या कारकिर्दीत ही इमारत उभारण्यात आली होती.
Sanguem government building
Sanguem government building Dainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: सांगेतील चारमजली मामलेदार कॉम्प्लेक्स इमारतीला लिफ्ट नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयात जाण्यासाठी खूप त्रास सहन करावे लागत आहेत. त्‍यामुळे यावर उपाययोजना म्हणून सांगेचे माजी नगरसेवक संजय रायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याशी संपर्क साधून लिफ्ट बसविण्याची मागणी केली होती. सदर इमारतीची दोन महिन्‍यांत आपण स्वतः पाहणी करून मागणी पूर्ण करू, असे दिलेले आश्वासन मात्र आता हवेत विरले आहे. (Sanguem latest news update)

Sanguem government building
नगरनियोजन खात्यात जुन्या तारखेने भरती; गोवा फॉरवर्डचा सरकारवर आरोप

माजी मंत्री पांडू वासू नाईक यांच्या कारकिर्दीत ही इमारत उभारण्यात आली होती. इमारत बांधताना लिफ्ट बसविण्यासाठी खास तरतूद केली होती. पण अखेरपर्यंत लिफ्ट बसविण्यात आली नाही. संजय रायकर यांनी हा प्रस्‍ताव यापूर्वी चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्‍यांच्‍याकडे ठेवला होता. पण, त्यांनीही या प्रस्‍तावाला वाटाण्याचा अक्षता लावल्या. आताही तीच परिस्थिती झाली आहे.

वास्‍तविक पाहता ज्‍या कार्यालयांचा जनतेशी थेट संपर्क येतो, त्‍या कार्यालयांत ज्‍येष्ठ नागरिक व महिला यांची वर्दळ असते. त्‍यामुळे अशी कार्यालये तळमजल्‍यावर किंवा लिफ्‍ट असल्‍याशिवाय ठेवू नयेत, अशी मागणी सांगेवासीयांनी केली आहे.

तक्रारीपेक्षा पायऱ्या चढलेल्‍या बऱ्या...

सांगेतील (Sanguem) चारमजली इमारतीमध्‍ये सर्वांत वरच्‍या मजल्‍यावर पाणी खात्याचे कार्यालय आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन जिने चढून वर जाताना नकोसे होत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक, किंवा निवृत्तीकडे आलेला कर्मचारी या कार्यालयात जाताना सरकारच्या नावाने बोटे मोडीत असतो. अपंग व्‍यक्ती तक्रारदार असल्‍यास त्‍याची होणारी गैरसोय गंभीरच आहे. इमारतीला लिफ्ट अत्यंत गरजेची झाली आहे. संजय रायकर यांची मागणी रास्त आहे. पण, अवघ्या पाच दहा लाख रुपयात होणारी गरज सरकार शब्द देऊन पूर्ण करू शकत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Sanguem government building
...म्हणून मयेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्‍यक्त केला

तज्‍ज्ञांकडून पडताळणी, अडले कुठे?

लोकांच्‍या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी इमारतीची पाहणी केली. त्‍यानंतर त्‍यांच्‍या निर्देशानंतर काही दिवसांतच तज्ज्ञ मंडळींनी लिफ्‍टसाठी सर्वेक्षण केले. लिफ्ट कशी बसविता येईल याची पडताळणी केली. पण, शेवटी आश्‍वासनापलीकडे लोकांना काहीच साध्य होऊ शकले नाही. आता नवीन सरकारकडून लोकांच्‍या अपेक्षा आहेत. संजय रायकर यांनी पुन्‍हा त्‍यासाठी प्रयत्न केल्यास लिफ्ट बसविण्याची गरज सरकारने (Government) पूर्ण करावी, अशी मागणी सांगेतील जागरुक नागरिकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com