Pernem Government School
Pernem Government SchoolDainik Gomantak

Pernem Government School: पेडणेतील एकही सरकारी शाळा बंद पडू देणार नाही; प्रवीण आर्लेकरांचे आवाहन

पालकांचेही सहकार्य
Published on

Pernem Government School: पेडणे मतदारसंघातील एकही सरकारी शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. त्यासाठी पालकांचेही सहकार्य मिळाले पाहिजे. त्‍यांनी आपल्या पाल्यांना जवळच्‍या सरकारी प्राथमिक शाळेत घालून या शाळा वाचविण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

Pernem Government School
वास्को MPT बर्थ क्रमांक आठ येथे अमोनिया वायूची गळती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

तळर्ण-पेडणे येथील सरकारी मिडल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठी वाहनाचे उद्‌घाटन आणि प्रथम शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी, पालकांच्‍या स्वागत समारंभात आर्लेकर बोलत होते.

यावेळी उपसरपंच सिद्धी राऊळ, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष नागेश शेट, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निवेदिता राऊळ, पंचसदस्य आरती राऊळ, शैलेश नाईक, जय गणेश स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष पांडुरंग नाईक, श्री देव रवळनाथ स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष नारायण राऊळ, अंगणवाडी शिक्षिका विद्या नाईक यांची उपस्‍थिती होती.

इयत्ता सहावीची विद्यार्थिनी धनश्री नाईक हिने स्वागतगीत सादर केले. अथर्व शेट, दुर्वी राऊळ, सुशांत आरोंदेकर या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. शाळेचे तुटलेले छप्पर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी स्वखर्चाने दुरुस्त करून दिले.

बंद पडलेली ही शाळा सुरू होऊन ७ पटसंख्येवरून आज संख्या ४८ एवढी वाढली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका विंदा हरमलकर, विधी परब, रुक्मिणी नाईक तसेच पालकांनी सहकार्य केले. सूत्रनिवेदन मुख्याध्यापक विशेष आसोलकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com