Dudhsagar Falls : दुधसागरला सायकल नाही, जीपनेच जा! ; वन खात्‍याचा आडमुठेपणा

लिथुआनियातील आठ सायकलस्‍वारांना रोखले
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak

Dudhsagar Falls : पर्यटन क्षेत्रात नव्‍या संकल्‍पनांची घोषणा करताना प्रशासनही तितकेच सकारात्‍मक हवे. युरोपमधील लिथुआनिया देशातून गोव्‍यात दाखल झालेल्‍या आठ सायकलस्‍वार पर्यटकांना कुळे येथील वन कर्मचाऱ्यांच्‍या आडमुठ्या धोरणामुळे नुकतेच दुधसागर, अभयारण्‍य सायकल सफरीला मुकावे लागले.

सायकलिंग करत देशभरातील विविध स्‍थळांना भेटी देत आठ सायकलस्‍वार गुरुवारी कुळे येथे वन खात्‍याच्‍या तपासणी नाक्‍यावर पोहोचले. सायकल सफरीद्वारे दुधसागर, भगवान महावीर अभयारण्‍य आणि मोले येथील नॅशनल पार्क पाहण्‍याची त्‍यांची तीव्र इच्‍छा होती.

परंतु वन खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांनी त्‍यांना सायकल घेऊन पुढे जाण्‍यास मनाई केली व सरकारने उपलब्‍ध केलेल्‍या जीपद्वारेच पुढे मार्गस्‍थ व्‍हा, अशी सूचना केली.

Dudhsagar Falls
गोव्यातील तरुणाचा लंडनमध्ये अपघाती मृत्यू ; केन्सिंग्टन हाय स्ट्रीटवर झाला अपघात

सायकलिंग करून इप्‍सितस्‍थळी का जाता येणार नाही, असा प्रतिप्रश्‍‍न केला असता संबंधित कर्मचाऱ्यांकडे ठोस उत्तर नव्‍हते. वास्‍तविक, याच परिसरात 2019 साली तत्‍कालीन आमदार प्रसाद पाऊस्‍कर यांनी मोठा गाजावाजा करत ‘जंगल सायकलिंग स्‍थळ’ म्‍हणून मान्‍यता दिली होती. तसा प्रचार व प्रसारही झाला होता.

सायकलस्वारांसोबत असलेले, त्‍याच परिसरातील ‘जंगल बुक’ रिसॉर्टचे मालक जोसेफ बर्रेटो यांच्या म्हणण्यानुसार, कुळे-दूधसागर पायवाट जीपच्या मार्गाला समांतर आहे. यापूर्वी आपण तेथून सायकल सफर केली आहे. तो अनुभव सुखद होता.

ते पुढे म्‍हणाले, लिथुआनियन सायकलस्वारांना अभयारण्यात जाऊ न दिल्याने साहसी पर्यटकांमध्‍ये चुकीचा संदेश जाईल. सायकलमुळे वाहनांसारखे कोणतेही वायू प्रदूषण होत नाही, अशीही त्‍यांनी टीपणीही केली. अखेर निराश झालेल्या आठ सायकलस्वारांनी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जीपसेवेचा लाभ घेतला.

Dudhsagar Falls
गोवा सरकारच्या अर्थसंकल्पाकडून तुम्हाला काय पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी लोकांकडून मागविल्या सूचना

म्हणे, वन्यप्राण्यांमुळे सायकलिंगला अटकाव!

‘गोमन्‍तक’ने वन अधिकारी सौरभ कुमार यांच्‍याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, ‘अभयारण्‍य परिसरात हिंस्र श्‍‍वापदांचा मुक्‍त संचार असल्‍याने सुरक्षेसाठी सायकलिंगचा मार्ग बंद करण्‍यात आला आहे. सायकलस्वारांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना अभयारण्यात प्रवेश दिला जात नाही.’

... मग जीप सेवाही थांबवावी लागेल

तेथील पर्यटन उद्योजक बार्रेटो म्‍हणतात, ‘वन्‍य प्राण्‍यांचाच धोका असेल तर जीपमधून दूधसागरला जाणाऱ्यांनाही रोखावे लागेल. कारण, धबधब्यापर्यंत जाण्‍यासाठी सुमारे एक किलोमीटर पायपीट करावी लागते आणि अशावेळीही तेथे हिंस्र जंगली प्राण्‍यांपासून इजा पोहोचू शकते.

समन्वयाचा अभाव

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्‍यावर वन्‍य प्राण्‍यांच्‍या धोक्‍याविषयी कसलाही उल्‍लेख केला नाही. याचाच अर्थ वरिष्‍ठ अधिकारी जे धोरण ठरवतात, ते रक्षक, वनपालांना माहीत नसते, असा दावाही करण्‍यात आला.

(फ्रँकी ग्रासियस)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com