South Goa: मुरगाव बंदर ते महामार्ग आणि दाबोळी ते बोगमाळो महामार्गांचे गडकरींच्या हस्ते होणार लोकार्पण; वाहतूकमंत्री

Nitin Gadkari Highway Inauguration in Goa: दोन महामार्गांच्या टप्प्यांचे २१ जानेवारी रोजी केंद्रीय रस्‍ते-वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
Nitin Gadkari, Mauvin Godinho
Nitin Gadkari, Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Nitin Gadkari Highway Inauguration in Goa

पणजी: मुरगाव बंदर ते महामार्ग तसेच दाबोळी ते बोगमाळो या महामार्गांच्या टप्प्यांचे २१ जानेवारी रोजी केंद्रीय रस्‍ते-वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

गोव्याच्या नवीन वाहनचाचणी केंद्राच्या मागणीला तसेच वाहनचालक परवाना नूतनीकरणाच्या कालावधीसाठी एक वर्षाऐवजी दोन वर्षे करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली, असे गुदिन्हो यांनी सांगितले. ते आज (07 डिसेंबर) दिल्लीत वाहतूक विकास परिषदेच्या ३७व्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

Nitin Gadkari, Mauvin Godinho
Bhoma Flyover: गडकरीजी, देवी सातेरी आणि तिच्या भावाची ताटातूट थांबवा; गोव्यातल्या ग्रामस्थांची आर्त हाक

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूकमंत्र्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी होते. गुदिन्हो यांनी सांगितले की, ही परिषद महत्त्वाच्या वाहतूक धोरणांवर चर्चा करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी, तसेच प्रादेशिक व राष्ट्रीय प्रगतीसाठी एकत्रित धोरणे तयार करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com