
पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोव्यात विकासाच्या कामांचा सावंत सरकारने धडाका लावला आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने विकास प्रकल्प पूर्ण केले जात आहेत. यातच मंगळवारी (21 जानेवारी) मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. उद्धाटनानंतर गडकरींनी आपल्या भाषणादरम्यान गोमंतकीयांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवणाऱ्या विकासकामांवर प्रकाश टाकला. एवढ्यावरच न थांबता गडकरींनी रस्त्यांमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना थेट तंबीच देऊन टाकली. त्यांनी बुलडोझर कारवाईचा इशारा दिला.
गडकरी म्हणाले की, ''माझी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि राज्याचे मुख्य सचिव यांना विनंती आहे की, मी जेव्हा या रस्त्याचं निरिक्षण करतो तेव्हा या रस्त्यामध्ये काही सरकारी लोकांनीच अतिक्रमण केलं असल्याचं मला संशय आहे. कारण त्याची लांबी काही बरोबर नाहीये. परंतु आता या रस्त्याचं काम करण्यापूर्वी तुम्ही हा रस्ता मोजून घ्या आणि आपल्या रेकॉर्डप्रमाणे ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांना ते पाडायला सांगा. त्यांनी जर मुदतीत पाडले नाहीतर मला सांगा मी बुलडोझर लावून ते पाडायची व्यवस्था करतो.''
1) एमईएस महाविद्यालय जंक्शन ते बोगमाळो जंक्शन आणि क्वीनी जंक्शन या 4 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूल.
2) झुआरी पुलापासून ते मडगाव बगल मार्गापर्यंतच्या चौपदरी महामार्गाचे (सात किलोमीटर) काम.
3) नावेली ते कुंकळ्ळी चार पदरी मार्गाचे (सात किलोमीटर) भूमिपूजन.
4) बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या 22.10 किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्ग.
5) फोंडा ते भोमा या 10 किलोमीटर लांबीच्या महामार्ग.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.