Pedne Toll Booth Case: टोल बूथ तोडफोड प्रकरण! नितेश राणे अखेर म्हापसा न्यायालयात हजर

Nitesh Rane Court Appearance: महाराष्ट्राचे बंदरे विकास, गृहनिर्माण आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच कणकवलीचे आमदार नितेश राणे अखेर म्हापसा न्यायालयात हजर झाले.
 Nitesh Rane Court Appearance
Pedne Toll Booth CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: महाराष्ट्राचे बंदरे विकास, गृहनिर्माण आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच कणकवलीचे आमदार नितेश राणे अखेर म्हापसा न्यायालयात हजर झाले. पेडणे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जुन्या तपासणी नाका व टोल बूथ तोडफोड प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते न्यायालयात उपस्थित राहिले.

४ जुलै २०२६ रोजी झालेल्या न्यायालयीन कामकाजादरम्यान नितेश राणे हे गैरहजर राहिले होते. म्हापसा न्यायालयाने त्यांची न्यायालयातील उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. वॉरंटची दखल घेत नितेश राणे सोमवारी (ता. ६) सकाळच्या सत्रात आपल्या वकिलांसोबत म्हापसा न्यायालयात हजर झाले.

 Nitesh Rane Court Appearance
Mapusa News Food Court: ऑक्टोबरपूर्वी म्हापशात उभे राहणार अत्याधुनिक 'फूड कोर्ट'! खवय्यांसाठी पालिका प्रशासनाची मोठी भेट; कसा असणार नवा लूक?

न्यायालयाने त्यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेतला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी ठेवली आहे. नितेश राणे यांचे वकील अभय चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पूर्ण पालन केले असून ते स्वतः सुनावणीसाठी हजर राहिले आहेत.

गेल्या ४ जुलै रोजी महाराष्ट्रात रेड अलर्ट असल्याने तसेच काही कारणास्तव ते गोव्यात पोहोचू शकले नव्हते. दरम्यान, हे प्रवेश शुल्क बूथ तोडफोड प्रकरण ३ डिसेंबर २०१३ रोजी धारगळ येथे घडले होते. या प्रकरणी राणे यांच्यासह अन्य आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com