CM Pramod Sawant: ‘एनआयओ’ने विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबवावेत

CM Pramod Sawant: 59 वा स्थापनादिन कार्यक्रम उत्साहात
CM Pramod Sawant on Children’s Day and Pandit Jawaharlal Nehru
CM Pramod Sawant on Children’s Day and Pandit Jawaharlal NehruDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान ही देशातील एक प्रमुख संस्था असून तिचे देशातील किनाऱ्यावरील विविध राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. गोव्यात एनआयओ असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

CM Pramod Sawant on Children’s Day and Pandit Jawaharlal Nehru
CM Pramod Sawant: 'अयोध्ये’चे दर्शन घडविणार

एनआयओने गोव्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते एनआयओ संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी एनआयओचे प्रमुख प्रा. सुनील कुमार सिंग, कार्यक्रम प्रमुख सनील कुमार उपस्थित होते. डॉ. सावंत पुढे म्हणाले, समुद्रविज्ञानाबाबत कुतूहल निर्माण करत भविष्यात एनआयओमध्ये गोमंतकीय विद्यार्थी कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात संशोधन करतील याबाबत विचार होणे त्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या साहाय्याने महाविद्यालय विद्यापीठात कार्यक्रम राबवावे असे त्यांनी सांगितले.

youtube.com/watch?v=bss7JiUDWoY

नेहमीच सहकार्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताला महासत्ता बनविण्यासाठी एनआयओचे महत्त्वाचे योगदान असणार आहे. गोव्यातील मत्सव्यवसाय, रेती व्यवसायाच्या अनुषंगाने संस्थेचे आम्हांला नेहमीच सहकार्य लाभले आहे.

गोव्याच्या शेतकऱ्यांना देखील उत्तम मार्गदर्शन केले आहे. नील अर्थव्यवस्था (ब्लु इकोनोमी) वाढविण्यासाठी देखील आपले मार्गदर्शन गरजेचे असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com