Goa Government | Souza Lobo Restaurant
Goa Government | Souza Lobo RestaurantDainik Gomantak

Souza Lobo Restaurant : सोझा लोबो हल्लाप्रकरणी नऊ संशयितांना सशर्त जामीन मंजूर

संशयितांना बार्देश तालुक्यात राहण्यास मनाई
Published on

म्हापसा अतिरिक्त सत्र जलदगती न्यायालयाने शुक्रवारी (ता.17) सोझा लोबो रेस्टॉरंट हल्ला प्रकरणातील नऊ संशयितांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तेवढ्याच रकमेच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायालयाने या संशयितांना दर 15 दिवसांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावण्यास सांगितले असून, त्यांना बार्देश तालुक्यात राहण्यास मनाई केली आहे.

Goa Government | Souza Lobo Restaurant
Prashasan Tumchya Daari: दलालांमुळेच पर्यटन व्यवसायावर परिणाम : रोहन खवंटे

शुक्रवारी सुनावणी झाली, ज्यात न्यायाधीशांनी विजय प्रकाश, संतोष चंद्रहास, सोहेल राणा हुसैन, हेमंत कुमार जोशी ऊर्फ गिल, सत्यवान कोरगावकर, पुष्पेंद्र मीना, मोहम्मद सादीक ऊर्फ लिंबू, मल्लिंगराया पुजारी आणि किशोर साळवी या नऊ संशयितांना सोझा लोबो प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला.

व्यावसायिक राजीव अरोरा याने गुन्हेगारी कट रचून संशयित सुनील भोमकर याच्यासह 10 ते 15 जणांना सोबत घेऊन सोझा लोबो रेस्टॉरंटवर हल्ला करायला लावला होता. या संशयितांनी फिर्यादीच्या मालमत्तेची तोडफोड केली आणि या सर्वांनी दगड, रिकाम्या बाटल्या, धातूचे पाईप यांसारख्या शस्त्रांनी बेकायदेशीरपणे रेस्टॉरंटस्थळी जमाव केला. या हल्ल्यात रेस्टॉरंटमधील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

Goa Government | Souza Lobo Restaurant
Sanjeev Verekar : ‘साहित्य अकादमी’ प्राप्‍त कवी संजीव वेरेकर निवर्तले

14 महिन्यांपासून तुरुंगात

28 डिसेंबर 2021 रोजी रात्री 9 वाजता कळंगुट येथील सोझा लोबो रेस्टॉरंटमध्ये हे हल्ला प्रकरण घडले होते. व्यावसायिक शत्रुत्वातून झालेल्या हल्लाप्रकरणी प्रथमदर्शनी पुरावे असल्याने म्हापसा न्यायालयाने यापूर्वीच एकूण 26 जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी संशयितांविरुद्ध भादंसंच्या 141, 143, 144,147, 148, 427, 326, ३०७, १२० (ब) व १४९ अन्वये गुन्हा नोंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com