Sai Baba Temple Takeover Case: बोरी साईबाबा मंदिर ताबा प्रकरणात नऊ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले; बनावट कागदपत्रांवर न्यायालयाचे ताशेरे

Goa Temple Dispute Court Order: फोंडा येथील आवेडे-बोरी श्री साईबाबा मंदिराच्या कथित बळकावण्याच्या आणि ताबा घेण्याच्या प्रकरणातील नऊ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
Goa Temple Dispute Court Order
Sai Baba Temple Takeover CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: फोंडा येथील आवेडे-बोरी श्री साईबाबा मंदिराच्या कथित बळकावण्याच्या आणि ताबा घेण्याच्या प्रकरणातील नऊ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आनंद नाईक, कमलाकर नाईक, शांताराम नाईक, सूरज नाईक, सनी नाईक, मुकेश नाईक, रजत बोरकर, वासुदेव नाईक आणि विराज नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी फोंडा पोलिस ठाण्यात २० जुलै २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. दिवाणी न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही ३० पेक्षा अधिक जणांच्या जमावाने बेकायदेशीर जमाव करून मंदिराच्या व्यवस्थापनावर ताबा मिळवण्यासाठी कुलूप तोडली आणि नवीन कुलूप लावले, असा आरोप तक्रारीत आहे.

Goa Temple Dispute Court Order
Goa Politics: काँग्रेसला 'हात' की वेगळी चूल? निवडणुकीबाबत 'आरजी'च्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

तपासाची कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तसेच इतर सहसंशयितांना जामीन मिळाला म्हणून या सर्वाना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने गुन्ह्याची भीषणता व गांभीर्य अधोरेखित केले.

संशयित रजत बोरकर याने आपण घटनेच्या वेळी शिर्डीच्या यात्रेला गेलो होतो, असा दावा करत कागदपत्रे सादर केली होती. मात्र, न्यायालयाने तपासणी केली असता ते रेल्वे तिकिट आणि दर्शनाचे पास जुलै २०२६ मधील नसून ऑगस्ट २०२६ मधील असल्याचे उघड झाले. न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या या बनावट कागदपत्रांबाबत न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत हा अर्ज थेट फेटाळून लावला.

Goa Temple Dispute Court Order
Goa Horticulture Development: गोव्यात आंबा, नारळ, काजू अन् बांबूसाठी स्वतंत्र मंडळे! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा नवा आराखडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.