गोव्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव?

जीनोम क्रमवारीसाठी नमुने पुण्यात चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत.
Omicron
OmicronDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनाच्या (corona) ओमिक्रोन व्हेरियन्टचे 5 संशयित गोव्यात. यापैकी 3 रशियन 2 जॉर्जियन असून हे सर्व प्रवासी 29 नोव्हेंबरला जहाजातून गोव्यात आले आहेत. सर्वांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह असून सर्व नमुने पुण्याच्या लॅब कडे पाठविण्यात आले आहेत. तसेच यापैकी चौघांचे कासावली प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण करण्यात आले आहे

सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे. सर्वांची तब्येत ठीक आहे.

देशात काल एका दिवसात ओमिक्रोन (Omicron) या कोरोनाच्या (COVID-19) नवीन व्हेरिएन्टचे रुग्ण आढळले आहेत. आणि ही बाब साऱ्या देशाला चिंतेत टाकणारी आहे. तापर्यंत, देशातील 5 राज्यांमध्ये या नवीन प्रकाराच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे. राजस्थान (Rajasthan), महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली, गुजरात आणि कर्नाटक. यापैकी राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात (Maharashtra Omicron) रुग्ण आढळले असून राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील लोकांना या नवीन प्रकाराची लागण झाली आहे.

Omicron
Goa Covid Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन्स

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व लागू करण्यात आली आहेत . केंद्राने 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांना विमानतळावर थांबावे लागणार आहे. सर्व विमानतळांवर अतिरिक्त RT-PCR सुविधेची व्यवस्था देखील केली जाणार आहे. 'जोखमीचे' देश वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. त्यांना 14 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. ज्या देशांना ओमिक्रॉनच्या धोक्याच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे, तिथून येणाऱ्या प्रवाशांपैकी 50% प्रवाशांची निश्चितपणे चाचणी केली जाईल. यानुसार, आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हवाई सुविधा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या स्व-घोषणा फॉर्ममध्ये फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी 14 दिवसांचा प्रवास इतिहास द्यावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com