Goa Politics: नीलेश काब्राल, साबांखाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

Goa Politics: कथित नोकरभरती प्रकरण; दक्षता खात्याकडे तक्रार
Goa congress
Goa congressDainik Gomanatk
Published on
Updated on

Goa Politics: सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या कथित बेकायदेशीर नोकरभरतीप्रकरणी काँग्रेसने गुरुवारी दक्षता आयोगाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल आणि खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Goa congress
Education Loan: जीईडीसीची सुधारित व्याजमुक्त कर्ज योजना

या तक्रारीचा काँग्रेस पाठपुरावा करणार आहेच, परंतु लवकरच पोलिसांत याप्रकरणाची तक्रार दाखल केली जाणार आहे. त्याचबरोबर न्यायालयात जाण्याबाबतही कायदेशीर बाजू पडताळल्या जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

काँग्रेसच्यावतीने दक्षता आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर पाटकर यांनी सांगितले की, सुरवातीला जी परीक्षा घेतली, त्यावेळी त्या पदासाठी युवकांनी मोठ्या आशेने परीक्षा दिली. परीक्षेत उत्तीर्ण होणार असे अनेकांना वाटले होते, परंतु त्या परीक्षेनंतर काय घडले हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्यांदा परीक्षा घेऊनही पुन्हा युवकांच्या आशाआकांक्षेवर पाणी फिरवण्याचे काम सरकारकडून झाले आहे. ज्यांना सरळमार्गे सरकारी नोकरीची आशा असेल त्यांचे भवितव्य काय असणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

Goa congress
Accidental Death: शिवोलीतील वीज दुर्घटना; दोषींवर कारवाई करणार!

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्या काळात परीक्षा झाली आणि त्यावेळी भाजपच्याच मंत्र्याने या नोकरभरतीत लाखो रुपये घेतल्याचा आरोप झाला. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याचे ठरले होते, परंतु या कथित घोटाळ्यामुळेच पाऊसकर यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. पाऊसकर यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली, परंतु त्या समितीने दिलेला चौकशी अहवाल सार्वजनिक झाला नाही, असेही ते म्हणाले.

तक्रारीची प्रत मुख्यमंत्र्यांना

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास खलप यांच्या सहीनिशी हा तक्रार अर्ज दक्षता आयोगाकडे सादर केला आहे. या तक्रार अर्जाची प्रत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे मुख्य सचिव यांनाही पाठवल्या आहेत.

पोलिसांतही तक्रार देणार

नीलेश काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नोकरभरतीत पारदर्शकता येईल, असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही, उलट तो चौकशी अहवालही बाहेर आला नाही. परीक्षेच्या निकालासाठी पाच महिन्यांचा काढण्यात आलेला वेळ, आपल्या मर्जीतले उमेदवार घुसवण्यासाठीच होता, असा संशय घेण्यास नक्कीच वाव असल्याचे पाटकर म्हणाले. आम्ही लवकरच पोलिसांत याप्रकरणी तक्रार देणार आहोत, त्याशिवाय न्यायालयात जाण्याबाबतही कायदेशीर बाबी पडताळल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

‘गोमन्तक’मधील वृत्तांचा दिला हवाला

प्रदेश काँग्रेसने दिलेल्या लेखी तक्रारीत ‘गोमन्तक’ने गेल्या पाच दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथित अभियंत्यांच्या बेकायदा नोकरभरती प्रकरणावर प्रकाश टाकला. कथित नोकरभरतीचे वृत्त प्रसिद्ध होताच, साबांखा खात्याच्या मंत्र्यांनी दिल्लीवरून परतताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या पाच दिवसांपासून या कथित नोकरभरती प्रकरणाच्या मागील घोटाळ्याचा ‘गोमन्तक’ने पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला आहे. या वृत्तांचा हवाला देत काँग्रेसने अखेर दक्षता आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com