Night Parties in Goa : रात्रीच्या पार्ट्यांवरुन कोर्टाने कान उपटले; गोवा पोलिस ॲक्शन मोडवर

पर्यटनमंत्री राेहन खंवटे यांनी किनारी भागातील उपद्रवी घटकांवर कारवाई करण्यात पोलिस असमर्थ ठरल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली.
BEACH PARTY
BEACH PARTYDainik Gomantak

Night Parties in Goa : राज्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनारी भागातील हॉटेल्स, पब, बार, रेस्टॉरंट व्यवस्थापनांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांचे आयोजन केले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे डोळेझाक करणाऱ्या पोलिस यंत्रणेचे बुधवारी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कान उपटल्याने ही यंत्रणा सतर्क झाली.

पेडणे, बार्देश तालुक्यासह दक्षिणेतही पोलिस कामाला लागले असून त्यांनी लोकांमध्ये जागृतीही सुरू केली आहे. मात्र, पर्यटनमंत्री राेहन खंवटे यांनी किनारी भागातील उपद्रवी घटकांवर कारवाई करण्यात पोलिस असमर्थ ठरल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली.

पर्यटन हंगाम सुरू होताच किनारी भागातील नाईट क्लब, पब, बार, हॉटेल, रेस्टॉरंट, शॅक व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत संगीत रजनी आयोजित करतात. तेथील कर्णकर्कश संगीतामुळे स्थानिकांची झोपमोड होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला असून रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक लावणे तसेच मोकळ्या जागेत संगीत रजनी आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच ध्वनी प्रदूषण झाल्यास तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे.

दक्षिण गोव्यातील सर्व किनाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये, यासाठी सर्व पोलिस स्थानकांना सतर्क केले आहे, असे दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी सांगितले. धानिया म्हणाले, दक्षिण गोव्यात किनारी भागात रात्रीच्या वेळी संगीताचा अतिरेक होत नाही. हे प्रकार बहुतेक उत्तर गोव्यात होतात. आम्हाला अजूनही अशा प्रकारच्या तक्रारी कुणीही केलेल्या नाहीत. तरीही आम्ही सर्व पोलिस स्थानकांना सतर्क केले आहे.

BEACH PARTY
Chorla Ghat: चोर्ला घाटात महाराष्ट्रातील कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे मात्र नाराज

किनारी भागात उपद्रवी व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत मी समाधानी नाही, असा घरचा अहेर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सरकारला दिला आहे. गोवा पोलिस पर्यटनातील गैरप्रकार रोखण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे पोलिस व पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार असून स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी गोवन व्हिलेज ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या व्यासपीठाद्वारे कला, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. चारही दिवस गोेवन व्हिलेज कार्यरत असेल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com