Candolim Panchayat : वारसा स्थळांच्या आवारात गैरधंद्यांना परवानगी टाळावी

कांदोळी ग्रामसभा : अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
Candolim
Candolim Dainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश तालुक्यातील आग्वाद किल्ला आणि तेथील वारसास्थळांच्या आवारात पर्यटनाच्या नावाखाली मद्यविक्री करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. कांदोळीतील सुज्ञ जनता अशा प्रकारच्या कृत्यांना कधीच मान्यता देणार नाही, त्यामुळे स्थानिक पंचायत मंडळाकडून अशा गैरधंद्यांसाठी कुठल्याही परिस्थितीत परवाना देण्याचे टाळावे.

अन्यथा रस्त्यावर उतरून याविरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा रविवारी (ता.26) पार पडलेल्या कांदोळी पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून पंचायत मंडळाला देण्यात आला. यावेळी सरपंच फेर्मिनो फर्नांडिस तसेच पंचायत मंडळाचे अन्य सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

Candolim
Velsao Railway Issue : वेळसाववासीयांना दिलासा, सहा घरे वाचणार

शेवटी, या भागात कार्यरत असलेल्या अनेक तारांकित हॉटेल्समधून बेकायदा कॅसिनो तसेच अन्य प्रकारचे जुगार सर्रासपणे सुरू असतात. अशा हॉटेल्स तसेच तेथील व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंचायत मंडळाने तत्पर राहणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

हेलिकॉप्टर राईड्सना विरोध

पर्यटन विकास महामंडळाकडून या भागात हेलिकॉप्टर राईड्स (फेऱ्या) सुरू करण्यासाठी होत असलेला प्रयत्न भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास वारसास्थळांबरोबरच पर्यटकांच्या जीवितास मोठा धोका ठरू शकतो.

त्यामुळे अशा राईड्स या भागातून कायमच्या रद्द करण्याची जोरदार मागणी ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी केली. यावर कांदोळी पंचायत मंडळ लवकरच गोवा पर्यटन विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com