Goa Drug Case: अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई: इस्त्रायली नागरिकाला दुसऱ्यांदा अटक, 9 लाखांचे ड्रग्स जप्त

Goa Crime News: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या एका मोठ्या कारवाईत इस्त्रायली नागरिक अटाला उर्फ यानिव्ह बेनाहीमला शिवोली येथून अटक करण्यात आली आहे.
Goa Drug Cas
Goa Drug CasDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं (Anti Narcotics Cell) केलेल्या एका मोठ्या कारवाईत इस्त्रायली नागरिक अटाला उर्फ यानिव्ह बेनाहीमला शिवोली येथून अटक करण्यात केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ९ लाख रुपयांचा कोकेन आणि चरस जप्त केला आहे.

विशेष म्हणजे, ही अटला याची ही पहिली अटक नाहीय. यापूर्वीही त्याला गोवा पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती, तसंच उत्तराखंड पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी अटक केली होती.

गंभीर पार्श्वभूमी असलेल्या अटलाकडून आता पुन्हा एकदा कोकेन आणि चरस जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गोवा पोलिसांकडून सुरु आहे. गोव्यात अमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी सतत कारवाया केल्या जात आहेत.

Goa Drug Cas
Goa Police: 850 पोलिस कर्मचारी बदली होऊनही त्याच ठिकाणी! अधीक्षकांकडून कारवाईचा इशारा; 6 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश

याआधी, मंगळवारी (१ एप्रिल) गोवा आणि झारखंड येथील आंतरराज्य ड्रग्स माफियांचा पर्दाफाश केला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून थिवी रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून २१ वर्षीय झारखंडच्या हिमांशू लालमणी सिंग याला अटक केली.

त्याच्याकडून ४.९० लाखांचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com