मडगाव : माडेल येथील एसजीपीडीए होलसेल मासळी मार्केट नव्याने बांधण्याचे काम चालू झाल्याने सध्या ज्या जागेत मासळी उतरविण्याचे काम चालू आहे ती कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक मच्छिमारांची मासळीची वाहने मार्केटात प्राधान्यक्रमाने घेण्याची तरतूद करावी अशी मागणी मच्छिमार फेडरेशनतर्फे आज करण्यात आली.
आज या फेडरेशनच्या शिष्टमंडळाने प्राधिकरणाचे अध्यक्ष दाजी साळकर यांच्याशी या बाबत चर्चा केली. या मार्केटात स्थानिक मच्छिमारानावाहने ठेवण्यास जागा उपलब्ध करून द्यावी तसेच त्यांच्याकडून दर तास या पद्धतीने भाडे न घेता सरसकट एकच शुल्क आकारावे अशी मागणी यावेळी फेडरेशनतर्फे करण्यांत आली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फेडरेशनचे अध्यक्ष विनय तारी यांनी दक्षिण गोव्यात लहान मोठे सुमारे 2 हजार बोटमालक असूनत्यांच्या दररोज किमान 200 गाड्या मासळी घेऊन मार्केटात येतात.
मात्र मडगाव मार्केटात बाहेरच्या राज्यातील मासळी घेऊन येणारी वाहने आधीच पार्क केलेली असल्याने स्थानिकांना आपली वाहने मार्केटमध्ये आणता येत नाहीत. यावर प्राधिकरणाने काही तरी तोडगा काढावा अशी मागणी घेऊन आम्ही आलो होतो असे सांगितले.
यासंदर्भात प्राधिकरणाचे अध्यक्ष साळकर याना विचारले असता, स्थानिक मच्छिमाराना भाड्यात सवलत देण्याबाबत विचार करता येणे शक्य आहे मात्र त्यांना दर तास या पध्दतीनेच भाडे द्यावे लागेल असे त्यांनी सांगितले.
फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनीही भाड्यात सवलत देण्याबाबत विचार करता येणे शक्य आहे. मात्र त्यांची वाहने ठेवण्यासाठी मार्केटचा विस्तार करण्यासाठी अधिक जमीन संपादित करण्याचा जर प्राधिकरणाचा विचार असेल तर त्याला आपला बिरोध असेल. या विस्तारासाठी शेतकऱ्यांची आणखी जमीन संपादन करण्यास आमचा विरोधच असेल असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.