NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

NFF Meeting Goa: नॅशनल फिश वर्कर्स फोरमने दोन दिवसांच्या ईसी बैठकीचा समारोप ६ किनारी राज्यांशी योग्य चर्चा केल्यानंतर देशातील मच्छिमारांवर परिणाम करणारे अनेक ठराव मंजूर करून केला.
NFF Meeting
NFF MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: नॅशनल फिश वर्कर्स फोरम (एनएफएफ)ने दोन दिवसांच्या ईसी बैठकीचा समारोप ६ किनारी राज्यांशी योग्य चर्चा केल्यानंतर देशातील मच्छिमारांवर परिणाम करणारे अनेक ठराव मंजूर करून केला.

पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छिमारांना परत आणण्यासाठी सरकारने तातडीने राजनैतिक प्रयत्न करावेत, असाही एनएफएफने ठराव केला, असे फोरमचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमोईस यांनी सांगितले.

नॅशनल फिश वर्कर्स फोरमने ओडिशातील भुवनेश्वर येथील रेड क्रॉस भवन येथे एक ईसी बैठक आयोजित केली होती, जी त्यांच्या संलग्न युनियन ओरिसा ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनने आयोजित केली होती. बैठकीनंतर पत्रकारांना सिमोईस यांनी माहिती दिली.

NFF Meeting
Goa Fishing: '..भविष्यात मासेच संपतील'!पारंपरिक मच्छिमारांकडून मासेमारी बंदीचे उल्लंघन; ट्रॉलरमालकांची कारवाईची मागणी

बंदरांशी संबंधित विस्तार योजना आणि गोव्यासह कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा व गुजरातमध्ये नवीन बंदरे बांधणे, आदी ठराव झाले, असेही सिमोईस यांनी सांगितले. बैठकीला अध्यक्ष प्रसन्न कुमार बेहेरा, अध्यक्ष, ओटीएफडब्ल्यूयू यांनी मार्गदर्शन केले.

NFF Meeting
Rapan Fishing: रापण ओढा रे! शेकडो वर्षांपासून उधाणलेला समुद्र, ढगाळ आकाशाखाली होणारी पारंपरिक मासेमारी पद्धत

‘किनारपट्टी हक्क’अंतर्गत मान्यता द्या!

‘एनएफएफ’ने या ईसी बैठकीत अशीही मागणी केली की भारतातील पारंपरिक मच्छिमारांना किनारपट्टी हक्क कायद्याअंतर्गत मान्यता देण्यात यावी, जसे वन हक्क कायद्याने आदिवासी समुदायांचे जंगलांवरील हक्क मान्य केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com