

पणजी: ‘‘आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेला राज्य सरकारकडून दरवर्षी आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात गोव्याचा लौकिक वाढत असून, पुढील वर्षीदेखील ही स्पर्धा गोव्यातच होईल आणि स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री या नात्याने मीच करेन’’, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी व्यक्त केला.
मिरामार किनाऱ्यावर आयोजित ‘आयर्नमॅन ७०.३’ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पोलिस महासंचालक आलोक कुमार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. ‘‘गोव्याची ओळख आता केवळ समुद्र पर्यटनापुरती मर्यादित राहिलेली नाही. जागतिक दर्जाचे क्रीडा स्थळ म्हणूनही गोवा उदयास येत आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत साधनसुविधा गोव्यात उभारण्यात येत आहे. पुढील काळातही क्रीडा क्षेत्राचा विकास अशाच पद्धतीने सुरू राहील. गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा गोव्यात होत असून, स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान मला मिळत आहे. पुढील वर्षीही स्पर्धा गोव्यातच (Goa) होईल आणि मुख्यमंत्री या नात्याने मीच स्पर्धेचे उद्घाटन करेन’’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’चा नारा दिला असून, देशभरातील तरुणाईला त्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘फिट इंडिया-फिट गोवा’चे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिकाधिक बळकटी देण्यात येत असून, त्याचा फायदा राज्यातील तरुणाईला होत आहे.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.