Mandovi river: पिळगाव भागात बेकायदा रेती उत्खनन; मांडवी नदीपात्रात 'रात्रीस खेळ चाले', चोरट्या मार्गाने वाळू उपसा

Illegal Sand Mining: वाळू माफीयांनी आता पिळगाव भागात मोर्चा वळविला असून, सारमानससह बागवाडा आदी भागात मांडवी नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्याचा सपाटा लावला आहे.
Illegal Sand Mining
Illegal Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: वाळू माफीयांनी आता पिळगाव भागात मोर्चा वळविला असून, सारमानससह बागवाडा आदी भागात मांडवी नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्याचा सपाटा लावला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. पिळगावमधील सारमानस आणि इतर भागात तर चक्क रात्रीच्यावेळी वाळू उपसा करण्यात येत असल्याची खात्रिलायक माहिती मिळाली आहे.

यापूर्वी खाण खाते आणि भरारी पथकाकडून झालेली कारवाई पाहता, डिचोलीतील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे. काही भागात बेकायदेशीरपणे रेती उत्खननाविरोधात अधूनमधून छापा टाकून कारवाई करण्यात येत असली, तरी कारवाईनंतर काही दिवस प्रकार बंद असतात. नंतर व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्यासाठी पुन्हा रान मोकळे होत असते.

Illegal Sand Mining
Konkan River: मुंबईची तहान भागवते, सह्याद्रीच्या कुशीत उगमस्थान; कोकणातील सर्वात लांब नदी कोणती?

मांडवी नदीचा फाटा असलेल्या सारमानस-पिळगाव नदीत गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्याचे प्रकार वाढले आहेत. या नदीत सारमानस, बागवाडासह कारापूरच्या बाजूने नदीपात्रात रात्रीच्यावेळी चोरून रेती उपसा करण्यात येत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या या रेती उत्खननामुळे सारमानस, बागवाड्यासह कारापूरच्या बाजूने नदीकाठची धूप झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेती-बागायती संकटात आली आहे, अशी माहिती काही स्थानिक बागायतदारांनी दिली आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून कारापूर नदीत बेकायदेशीरपणे रेती काढण्यात येत आहे. मात्र, आता या बेकायदा व्यावसायाची व्याप्ती वाढली असून, वाळू माफीयांनी नदीपात्रावर कब्जा मिळवला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Illegal Sand Mining
Siolim Lake: शिवोलीवासीय जिंकले! तलावात भर घालून बांधकाम करण्याच्या प्रयत्नाला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

शेती-बागायती संकटात येण्याची भीती

रेती उत्खनन करण्यास कायद्याने बंदी आहे. तरीदेखील डिचोली तालुक्यातील विविध भागात बेकायदेशीरपणे हा व्यवसाय चालूच आहे. बेकायदा रेती उत्खनन व्यवसायाची पाळेमुळे आता पिळगावसह अन्य भागातही पोहोचली आहेत. रात्रीच्यावेळी काही होड्या येत असून, बेकायदा रेती उत्खनन करीत असल्यामुळे आम्ही हतबल झालो आहेत.

या रेती माफीयांकडून दमदाटीही करण्यात येते, अशी माहिती नदीकाठी शेती व नारळाच्या बागायती असलेल्या काही बागायतदारांनी दिली. रेती उत्खननामुळे नदीच्या धडा कोसळत आहेत. नदीकाठच्या बांधांना भगदाड पडत आहे. नदीचे पाणी शेती-बागायतीत घुसत असून, शेतजमीन आणि माडांची हानी होत आहे. हा प्रकार जर असाच सुरू राहिला, तर शेती-बागायती संकटात येणार आहेत, अशी भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com