Manish Jadhav
कोकण किनारपट्टीवर अनेक नद्या वाहतात, पण त्यात 'वैतरणा' ही सर्वात लांब आणि महत्त्वाची नदी मानली जाते. पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ही नदी वरदान ठरली.
वैतरणा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वताच्या रांगांमध्ये होतो. येथून ही नदी पश्चिमेकडे कोकणच्या दिशेने प्रवाहित होते.
ही नदी साधारणपणे 154 किलोमीटर लांब आहे. सह्याद्रीतून उगम पावून ती अरबी समुद्राला मिळेपर्यंत पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण प्रदेश व्यापते.
वैतरणेला प्रवासात पिंजाल, सूर्य आणि तानसा यांसारख्या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. या उपनद्यांमुळे नदीचे खोरे अधिक सुपीक झाले.
वैतरणा नदीवर मोडक सागर (लोअर वैतरणा), मिडल वैतरणा आणि अप्पर वैतरणा ही धरणे आहेत. या धरणांतून मुंबई महानगराला मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
या नदीवर जलविद्युत निर्मितीचे प्रकल्पही राबवले जातात. शेतीसोबतच औद्योगिक गरजा पूर्ण करण्यात वैतरणा नदीचा मोठा वाटा आहे.
आपला 154 किमीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर वैतरणा नदी पालघर जिल्ह्यातील दातीवरे खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते.