Goa Illegal Spa: 'स्‍पा'वर कारवाई! ठोकले सील, पणजीतील 21 आस्‍थापने बेकायदा असल्‍याचे उघड

Panaji Illegal Spa Crackdown: अचानक जाग आलेल्‍या सरकारी यंत्रणेने पणजीत फोफावलेल्‍या स्पा आणि मसाज सेंटरवर आज धडक कारवाई केली.
illegal spas sealed in Panaji Goa
illegal spas sealed in Panaji GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अचानक जाग आलेल्‍या सरकारी यंत्रणेने पणजीत फोफावलेल्‍या स्पा आणि मसाज सेंटरवर धडक कारवाई केली. बेकायदा ‘स्पा’ आस्थापनांना सील ठोकण्‍यात आले. ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. अचानक जाग आलेल्‍या सरकारी यंत्रणेने पणजीत फोफावलेल्‍या स्पा आणि मसाज सेंटरवर आज धडक कारवाई केली. बेकायदा ‘स्पा’ आस्थापनांना सील ठोकण्‍यात आले. ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पणजी शहरात नेमकी किती स्पा आस्‍थापने सुरू आहेत, याची माहिती जिल्हा प्रशासनाने मागवली होती. त्यानुसार शहरात तब्बल ४५ स्पा कार्यरत असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित आस्थापनांची पडताळणी मोहीम हाती घेतली. या तपासणीत ‘स्पां’कडे पणजी महापालिकेचा व्यापार परवाना, आरोग्य खात्याचा दाखला, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आहे का, याची छाननी करण्यात आली.

illegal spas sealed in Panaji Goa
Panji Market Issue: पणजीतील मांस विक्रेते अजूनही वाऱ्यावर! कोर्टाच्या आदेशालाही मनपाची केराची टोपली

प्राथमिक तपासणीत २१ स्पांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यानंतर या स्पांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मामलेदार कार्यालय, पणजी महापालिका, आरोग्य खाते, अग्निशमन दल आणि पोलिस विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी आवश्यक परवाने आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संबंधित स्पा सीलबंद करण्यात आले. कारवाईची माहिती शहरभर पसरताच अनेक स्पा चालकांनी स्वतःहून आस्थापने बंद ठेवणे पसंत केले.

संबंधित व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सील हटवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काही आस्थापनांची कागदपत्रे मुदतबाह्य झाल्याचेही आढळून आली असून त्यांना तत्काळ नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील १८ जून रस्ता परिसरातील एका स्पा आणि मसाज सेंटरवर छापा टाकून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पणजी शहरात स्पा आणि मसाज सेंटरचे मोठ्या प्रमाणावर जाळे विस्तारले आहे.

illegal spas sealed in Panaji Goa
Panji: स्मार्ट सिटीची दैना; नवीन डांबरीकरण केलेला रस्ता पावसात गेला वाहून!

निवासी भाग, व्यापारी संकुले आणि मुख्य रस्त्यांवर सुरू झालेल्या या व्यवसायांबाबत स्थानिक नागरिक सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते. ‘नेमके किती परवानाधारक आणि किती बेकायदेशीर?’ हा प्रश्न कायमच चर्चेत राहिला. प्रशासनाने दीर्घकाळ या प्रकाराकडे डोळेझाक केल्याची टीका आता पुन्हा जोर धरू लागली आहे. सार्वत्रिक निवडणुकांनंतर वाढलेला लोकक्षोभ, सामाजिक माध्यमांवरील संताप आणि सरकारी यंत्रणांवर वाढलेला दबाव यामुळे अखेर प्रशासनाला कारवाई करावी लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

आता ही मोहीम केवळ दाखवण्‍यापुरती राहणार की बेकायदेशीर स्पा व्यवसायावर खरोखरच मोठा आघात होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ ‘स्पां’कडे आवश्यक परवानेच नाहीत प्राथमिक पडताळणीत २१ स्पा आस्‍थापनांकडे महापालिकेचा व्यापार परवाना, आरोग्य खात्याचा दाखला, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता नसल्याचे आढळले. त्यानंतर या आस्थापनांवर सीलबंदची कारवाई करण्यात आली. बाबूशनी झटकले होते हात!

illegal spas sealed in Panaji Goa
Panaji Smart City: पणजी स्‍मार्ट सिटी; 31 प्रकल्‍पांवर 630.34 कोटी खर्च; नगरविकासमंत्री राणेंनी दिली माहिती

पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना यापूर्वी वाढत्या स्पा व्यवसायाबाबत विचारले असता त्यांनी, ‘तो महापौरांचा विषय आहे’ असे सांगून जबाबदारी झटकली होती. विशेष म्हणजे त्यावेळी महापौरपदी त्यांचे पुत्र रोहित मोन्सेरात होते. त्यामुळे विरोधकांनी ‘सत्ता स्वतःकडे आणि जबाबदारी दुसऱ्यांवर’ अशी टीका केली होती.

‘गोमन्तक टीव्ही’वरील चर्चेनंतर हालचाल

‘गोमन्तक टीव्ही’वरील एका चर्चासत्रात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी पणजतील १८ जून मार्गावर वाढलेल्या स्पांबाबत गंभीर वक्तव्‍ये केली होती. देशभरातील मुलींना आणून देहविक्रयासाठी वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या चर्चेनंतर अवघ्या तीन दिवसांत प्रशासनाने धडक कारवाई सुरू केल्याने त्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

illegal spas sealed in Panaji Goa
Panaji: स्मार्ट रस्ते केले, गॅसवाहिनी नाही टाकली! पणजीतला सावळागोंधळ; हॉटेलमालकांची सिलिंडरसाठी धावपळ

अहवालात नोंद स्‍पा-पार्लर

पोलिसांनी सादर केलेल्‍या अहवालात झिवा सलून स्‍पा, इन्‍फिनिटी सलून ॲण्‍ड स्‍पा, फ्‍युजन सलून ॲण्‍ड स्‍पा, स्‍पा नेक्‍स्‍ट सलून ॲण्‍ड स्‍पा, वाईब्‍स्‌ सलून ॲण्‍ड स्‍पा, एला थाई सलून ॲण्‍ड स्‍पा, ओशियनिक सलून ॲण्‍ड स्‍पा, विस्‍तारा थाई स्‍पा, ऊर्जा वेलनेस स्‍पा सेंटर, रॉकस्‍टार युनिसेक्‍स स्‍पा, व्हॅनिला लक्‍झरी सलून ॲण्‍ड स्‍पा, रॉयल अोक स्‍पा, शेरॉन सलून ॲण्‍ड स्‍पा, सॅम फायर युनिसेक्‍स सलून ॲण्‍ड स्‍पा, द सलून ॲण्‍ड स्‍पा, ब्‍लू टेरा स्‍पा, टुलिप सलून ॲण्‍ड स्‍पा, मेरिगोल्‍ड सलून ॲण्‍ड स्‍पा, कॉसमॉस सलून ॲण्‍ड स्‍पा, इम्‍पेरियल थाई सलून ॲण्‍ड स्‍पा आणि सितारा सलून ॲण्‍ड स्‍पा या आस्‍थापनांचा उल्लेख केला आहे.

उत्पल पर्रीकरांचा इशारा चर्चेत

पणजी महानगरपालिका निवडणुकीदरम्यान उत्पल पर्रीकर यांनी, ‘पणजी स्पाची राजधानी बनत चालली आहे’ असा आरोप केला होता. त्यावेळी त्या वक्तव्याकडे राजकीय टीका म्हणून पाहिले गेले. मात्र आता त्यांच्या इशाऱ्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

illegal spas sealed in Panaji Goa
Panaji Municipal Elelction: पणजीचा मार्ग कुठला, सत्तेचा की बदलाचा?

२४ आस्‍थापनांकडे परवानगी

पणजी पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्‍या अहवालात म्‍हटले होते की, पणजीत ४५ स्‍पा-पार्लर सुरू असून, पैकी २४ आस्‍थापनांकडे आरोग्‍य खात्‍याची परवानगी आहे. तर, २१ जणांकडे परवानगी नसून, तेही सुरू आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविराेधात योग्‍य ती कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com