Goa Zilla Panchayat: दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्ष बदलणार; राजकीय घडामोडींना वेग

Sadanand Tanavade: नवीन अध्यक्षांच्या नावांची निवड पुढील होणाऱ्या बैठकीत ठरविणार असल्याची बातमी
Sadanand Tanavade: नवीन अध्यक्षांच्या नावांची निवड पुढील होणाऱ्या बैठकीत ठरविणार असल्याची बातमी
Zilla Panchayat Presidents, Sadanand TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात बदल निश्चित असतानाच राज्यातील दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षांना बदलण्याच्या हालचालींना देखील वेग आला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा पंचायतींचे दोन्ही अध्यक्ष राजीनामा देण्याची शक्यता आहे.

जिल्हा पंचायत निवडणुका अगदी जवळच्या उंभरट्यावर असताना नवीन अध्यक्ष निवड करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत असताना दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

दक्षिण गोव्याच्या जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा सुबोध तेंडुलकर तर उत्तर गोव्याचे जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्याकडून ३१ ऑगस्ट रोजी राजीनामा सादर होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत दोन्ही अध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही अध्यक्षांना राजीनामा सादर करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु नवीन अध्यक्षांची नावे अजून निश्‍चित झालेली नाहीत. नवीन अध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे कार्यकर्त्यांची नजर लागून राहिली आहे.

Sadanand Tanavade: नवीन अध्यक्षांच्या नावांची निवड पुढील होणाऱ्या बैठकीत ठरविणार असल्याची बातमी
Goa Zilla Panchayat: जि. पं. अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

पणजी येथे झालेल्या बैठकीत दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर तर उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भाजप प्रदेक्षाध्यक्षांकडून देण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या आदेशानंतर दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्षांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केल्यानंतर १ ऑगस्ट पूर्वी अध्यक्षपदाचे राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगण्यात येते.

पक्षाच्या मागणीनुसार मी येत्या ३१ जुलै रोजी जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. मागील ३ वर्षे सात महिने मी पक्षाच्या मार्गदर्शनखाली जिल्हा पंचायत अध्यक्षपद भूषविले आहे. या कार्यकाळात आपण जनतेसाठी चांगले काम केलेले आहे. सर्व जिल्हा पंचायत सदस्यांना योग्य न्याय आहे. आपण पक्षाची कार्यकर्ती असून या पुढेही पक्ष जी काही जबाबदारी देईल ती आपण पूर्ण करणार असल्याचे जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी सांगितले.

Sadanand Tanavade: नवीन अध्यक्षांच्या नावांची निवड पुढील होणाऱ्या बैठकीत ठरविणार असल्याची बातमी
Goa Third District: सभापती रमेश तवडकरही म्हणतात, 'गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा', कारणही स्पष्ट केले

तानावडेंकडून दुजोरा

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांना या संदर्भात विचारले असता गोव्याच्या दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्ष बदलण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र नवीन अध्यक्षांच्या नावांची निवड पुढील होणाऱ्या बैठकीत ठरविणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com