Goa NSUI: 'एनटीए' तातडीने बरखास्‍त करा! पेपरफुटी प्रकरणांच्या निषेधार्थ 'एनएसयूआय'चे आंदोलन, मंत्र्याच्‍या राजीनाम्‍याची मागणी

NEET Paper Scam: देशात वारंवार घडत असलेल्या स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी प्रकरणांच्या निषेधार्थ ‘एनएसयूआय’तर्फे पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.
NEET Paper Scam
NEET Paper ScamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशात वारंवार घडत असलेल्या स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी प्रकरणांच्या निषेधार्थ ‘एनएसयूआय’तर्फे पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) बरखास्त करण्याची मागणी केली.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पअलीकडेच ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परीक्षांतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरचिटणीस कुमार गवळी यांनी सांगितले की, देशात मागील दहा वर्षांत ८९ हून अधिक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्‍या.

NEET Paper Scam
Goa Accident Death: मॉर्निंंग वॉक दरम्यान काळाचा घाला; पत्रादेवी येथे 65 वर्षीय वृद्धाला कंटेनरने चिरडले, चालकाला रत्नागिरीतून अटक

तसेच या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढून मानसिक त्रासाच्या घटना वाढल्‍या. २०१७ पासून परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सीची स्थापना करण्यात आली होती; मात्र ही यंत्रणाच परीक्षा माफियांशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एनटीए बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली.या आंदोलनात एनएसयूआयचे सदाशिव बडीकर, मुस्कान बेपारी, झेद शेख, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

न्यायासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरूच

गेल्या वर्षी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पेपरफुटी प्रकरणांवर कारवाई व अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. मात्र पुरावे नसल्‍याचे सांगण्‍यात आले. देशभरातील विद्यार्थी न्यायासाठी आंदोलन करत आहेत. गोव्यातही ‘नीट’ प्रकरणाशी संबंधित एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना घडली, असे यावेळी सांगण्‍यात आले.

NEET Paper Scam
NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

युवकांना झुरळाची दिली जातेय उपमा!

सदाशिव बडीकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. लाखो विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यावर उतरले असतानाही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. विद्यार्थ्यांना गृहीत धरले जात असल्याने देशाचे भवितव्य धोक्यात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिली जात असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com