Ration Shop Scam: कुठ्ठाळी येथे तांदळाचा काळाबाजार; स्वस्त धान्य दुकानातून 'रेशनकार्ड' नसलेल्या व्यक्तीस थेट 'गोणी विक्री'

Goa Rice Black Marketing : कुठ्ठाळी-पाजेंतार येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३४ मधून तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
illegal sale of government ration rice uncovered
illegal sale of government ration rice uncoveredDainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी-पाजेंतार येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३४ मधून तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित दुकानदाराने एका व्यक्तीस रेशनकार्ड नसतानाही तांदळाची गोणी थेट काळ्या बाजाराच्या भावात विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित ग्राहकाने ती गोणी दुचाकीवर घेऊन जात असताना हा प्रकार एका स्थानिक पत्रकाराच्या निदर्शनास आला.

या प्रकरणाबाबत दुकानदार व संबंधित ग्राहकाला विचारणा करण्यात आली असता दोघांनीही कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे नागरी पुरवठा खात्याच्या नियंत्रण आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सामान्य रेशनकार्डधारकांना अनेकदा पाच किलो तांदूळ मिळण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागतो.

illegal sale of government ration rice uncovered
Cortalim : कुठ्ठाळीतील यादीतून मतदार गायब! SIR मध्ये घोळ; ‘टीएमसी'ने दिला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

मात्र काही व्यक्तींना नियम डावलून थेट गोण्यांच्या स्वरूपात धान्य विक्री केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, स्वस्त धान्य वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डोळे स्कॅन करणाऱ्या यंत्राबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला एकाच यंत्रासमोर डोळे ठेवून ओळख पटवावी लागत असल्याने नेत्रसंसर्गाचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

दोषींवर कारवाई करा

विशेष म्हणजे, संबंधित ग्राहकाकडे धान्य घेण्यासाठी आवश्यक असलेले रेशनकार्ड नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही त्याला कोणतीही पडताळणी न करता धान्य दिल्याने संशय बळावला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com