Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकात बेशिस्तपणा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या धोक्याने प्रवासी त्रस्त

Bicholim Transport Issues: डिचोली येथील तात्पुरत्या बसस्थानकात वाढत्या बेशिस्तपणामुळे, तसेच वाहतुकीमुळे रहदारीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
Bicholim Bus Stand
Bicholim Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली येथील तात्पुरत्या बसस्थानकात वाढत्या बेशिस्तपणामुळे, तसेच वाहतुकीमुळे रहदारीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा प्रकार दररोज होत आहे.

एखाद्या गंभीर अपघाताची शक्यताही व्यक्त केली जात आहे.सकाळी साडेसात ते नऊ आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात बसगाड्यांची वर्दळ वाढते. आधीच तात्पुरत्या बसस्थानकासाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत असल्याने, एकाच वेळी तीन ते चार बसगाड्या आल्यास परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण होते.

Bicholim Bus Stand
Panaji Bus Stand: पणजी बसस्थानकावरील जलसुविधा अखेर सुरळीत, कदंब महामंडळाला आली जाग; प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर

बसगाड्या अनेकदा आडव्यातिडव्या पद्धतीने उभ्या केल्या जात असल्याने इतर बसगाड्यांना स्थानकात प्रवेश करणे आणि बाहेर पडणे कठीण होते.यातच काही वाहनचालकांकडून बसस्थानकाजवळील ‘नो पार्किंग’ क्षेत्रातही बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावून वाहने अडकून पडतात. परिणामी, प्रवाशांसह अन्य वाहनधारकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

उपाय योजना करा!

बसस्थानक परिसरातील ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, संबंधित विभागाने तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com