Goa Third District: नवा तिसरा जिल्हा आणि मुख्यालय; काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार का मानले? काँग्रेस आमदाराचा सवाल

New Third District To Be Formed In Goa: तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या तालुक्यात उभारायचे याचा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.
Congress questions new district Goa
MLA Altone D'CostaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे येथे उभारण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार का मानले, असा सवाल करीत केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता सोमवारी विधानसभा सभागृहात आक्रमक झाले.

त्यावर, तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या तालुक्यात उभारायचे याचा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

सांगे, केपे, धारबांदोडा आणि काणकोण या चार तालुक्यांचा समावेश असलेला नवा जिल्हा स्थापन करून त्याचे मुख्यालय कुडचडे येथे उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आमदार नीलेश काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Congress questions new district Goa
Green Tax: हरित करावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री सावंतांना घेरले; CM म्हणाले, 'नंतर उत्तर देऊ'

परंतु, सभापती रमेश तवडकर आणि आपण गेल्या अनेक महिन्यांपासून तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे उभारण्याची मागणी करीत आहोत. आमच्या मागणीचा सरकारने गांभीयनि विचार करणे आवश्यक आहे, असे आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले.

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सांगे, केपे, धारबांदोडा आणि काणकोण या चार तालुक्यांचा नवा जिल्हा निर्माण केला जाणार आहे. जिल्ह्याचे मुख्यायल कोठे व्हावे यासाठी आता वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. सरकारने यानंतर अधिकृत पत्रकाद्वारे तिसऱ्या जिल्ह्याचे नाव आणि मुख्यालय अद्याप निश्चित झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com